मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PSL 2023 मध्ये पडतोय शतकांचा पाऊस, बाबर-रिझवानसह आतापर्यंत या फलंदाजांनी ठोकली शतकं

PSL 2023 मध्ये पडतोय शतकांचा पाऊस, बाबर-रिझवानसह आतापर्यंत या फलंदाजांनी ठोकली शतकं

Mar 12, 2023, 01:24 PMIST

All Centuries in PSL 2023 : पाकिस्तान सुपर लीगमध्ये आतापर्यंत फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. PSL 2023 च्या या मोसमात आतापर्यंत ७ शतके झळकली आहेत. त्याचबरोबर या मोसमात PSL इतिहासातील सर्वात वेगवान शतकही आले आहे. PSL 2023 मध्ये आतापर्यंत मुल्तान सुल्तानच्या तीन फलंदाजांनी शतक ठोकले आहे.

  • All Centuries in PSL 2023 : पाकिस्तान सुपर लीगमध्ये आतापर्यंत फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. PSL 2023 च्या या मोसमात आतापर्यंत ७ शतके झळकली आहेत. त्याचबरोबर या मोसमात PSL इतिहासातील सर्वात वेगवान शतकही आले आहे. PSL 2023 मध्ये आतापर्यंत मुल्तान सुल्तानच्या तीन फलंदाजांनी शतक ठोकले आहे.
Usman Khan - मुल्तान सुल्तानच्या उस्मान खानने पाकिस्तान सुपर लीगच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले आहे. ११ मार्च रोजी क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला. उस्मानने ३६ चेंडूत १०० धावा ठोकल्या. पीएसएलमधील हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान शतक आहे.
(1 / 8)

Rilee Roscoe - रिले रुसोनेही पीएसएलमध्ये पेशावर झल्मीविरुद्ध धडाकेबाज शतक झळकावले होते. रिले रुसोने पेशावरविरुद्ध ४१ चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले. या सामन्यात त्याने एकूण १२१ धावा केल्या होत्या.
(2 / 8)

Babar Azam - पेशावर झाल्मीचा कर्णधार बाबर आझमनेही PSL 2023 मध्ये शतक झळकावले आहे. क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्ध त्याने ६५ चेंडूत ११५ धावांची खेळी केली.
(3 / 8)

Jason Roy- बाबर आझमच्या शतकानंतर, त्याच सामन्यातील दुसरे शतक क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून इंग्लंडचा स्फोटक सलामीवीर जेसन रॉयच्या बॅटमधून आले. त्या सामन्यात रॉयने ६३ चेंडूत १४५ धावा ठोकल्या.
(4 / 8)

Mohammad Rizwan - पीएसएलमध्ये मुलतान सुल्तान्सचा कर्णधार असलेल्या मोहम्मद रिझवाननेही या मोसमात कराची किंग्जविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने ६४ चेंडूत ११० धावा केल्या.
(5 / 8)

Fakhar Zaman- लाहोर कलंदर्सचा अनुभवी स्फोटक सलामीवीर फखर झमाननेही या मोसमात शानदार शतक झळकावले. इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध त्याने हे शतक झळकावले होते.
(6 / 8)

Martin Guptill - पीएसएलच्या या मोसमात मार्टिन गप्टिलनेही चांगली कामगिरी केली आहे. कराची किंग्जविरुद्ध त्याने ६७ चेंडूत ११७ धावा ठोकल्या होत्या. 
(7 / 8)

All Centuries in PSL 2023
(8 / 8)
All Centuries in PSL 2023(photos - twiiter )

    शेअर करा