मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Asia Cup 2022 Final: श्रीलंकेनं कशी केली पाकिस्तानवर मात; मैदानात काय घडलं? पाहा

Asia Cup 2022 Final: श्रीलंकेनं कशी केली पाकिस्तानवर मात; मैदानात काय घडलं? पाहा

Sep 12, 2022, 11:12 AMIST

Sri Lanka Vs Pakistan Asia Cup 2022 Final: आशिया कप क्रिकेट स्पर्धेत अखेर श्रीलंकेनं बाजी मारली आहे. लंकेनं पाकिस्तानचा सहज पराभव करत सहाव्यांदा आशिय चषक विजेतेपदावर नाव कोरले. भारत स्पर्धेबाहेर फेकला गेल्यामुळं क्रिकेटप्रेमींची निराशा झाली होती. मात्र, ती क्षणिक ठरली. जगभरातील क्रिकेटप्रेमींनी कालच्या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला.

  • Sri Lanka Vs Pakistan Asia Cup 2022 Final: आशिया कप क्रिकेट स्पर्धेत अखेर श्रीलंकेनं बाजी मारली आहे. लंकेनं पाकिस्तानचा सहज पराभव करत सहाव्यांदा आशिय चषक विजेतेपदावर नाव कोरले. भारत स्पर्धेबाहेर फेकला गेल्यामुळं क्रिकेटप्रेमींची निराशा झाली होती. मात्र, ती क्षणिक ठरली. जगभरातील क्रिकेटप्रेमींनी कालच्या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला.
आशिया कपची फायनल कोण जिंकेल याबाबत उत्सुकता होती. कागदावर पाकिस्तानचा संघ मजबूत वाटत होता. मात्र, श्रीलंकेनं सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली आणि बाजी मारली. लंकेनं पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव केला आणि पाचव्यांदा आशिया चषक जिंकला. विजयानंतर श्रीलंकन खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांनी जोरदार जल्लोष केला.
(1 / 8)
आशिया कपची फायनल कोण जिंकेल याबाबत उत्सुकता होती. कागदावर पाकिस्तानचा संघ मजबूत वाटत होता. मात्र, श्रीलंकेनं सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली आणि बाजी मारली. लंकेनं पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव केला आणि पाचव्यांदा आशिया चषक जिंकला. विजयानंतर श्रीलंकन खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांनी जोरदार जल्लोष केला.(AP)
पाकिस्ताननं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दहा षटकांत हारीस रौफ आणि नसीम शहा यांनी श्रीलंकन खेळाडूंना बऱ्यापैकी जखडून ठेवलं होतं. मात्र, ते पुरेसं ठरलं नाही. कालांतरानं श्रीलंकन फलंदाजांनी जम बसवत एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
(2 / 8)
पाकिस्ताननं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दहा षटकांत हारीस रौफ आणि नसीम शहा यांनी श्रीलंकन खेळाडूंना बऱ्यापैकी जखडून ठेवलं होतं. मात्र, ते पुरेसं ठरलं नाही. कालांतरानं श्रीलंकन फलंदाजांनी जम बसवत एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली.(REUTERS)
भानुका राजपक्ष हा श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. लंकेचे अन्य फलंदाज चाचपडत असताना भानुकानं एक बाजू लावून धरत धडाकेबाज फलंदाजी केली. त्यानं अवघ्या ४५ चेंडूत ७१ धावांची वादळी खेळी केली. त्यामुळं श्रीलंकेला ६ बाद १७० धावांपर्यंत मजल मारता आली. भानुकाची ही खेळी हा सामन्यातील एक टर्निंग पॉइंट होता.
(3 / 8)
भानुका राजपक्ष हा श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. लंकेचे अन्य फलंदाज चाचपडत असताना भानुकानं एक बाजू लावून धरत धडाकेबाज फलंदाजी केली. त्यानं अवघ्या ४५ चेंडूत ७१ धावांची वादळी खेळी केली. त्यामुळं श्रीलंकेला ६ बाद १७० धावांपर्यंत मजल मारता आली. भानुकाची ही खेळी हा सामन्यातील एक टर्निंग पॉइंट होता.(ANI)
२० षटकांत १७० धावसंख्या उभारल्यानंतरही श्रीलंका सुरुवातीला बचावात्मक पवित्र्यात होती. त्यातूनच त्यांच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच ९ अतिरिक्त धावा दिल्या. त्यानंतर मात्र गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पाकिस्तानी फलंदाजांना डोकं वर काढू दिलं नाही.
(4 / 8)
२० षटकांत १७० धावसंख्या उभारल्यानंतरही श्रीलंका सुरुवातीला बचावात्मक पवित्र्यात होती. त्यातूनच त्यांच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच ९ अतिरिक्त धावा दिल्या. त्यानंतर मात्र गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पाकिस्तानी फलंदाजांना डोकं वर काढू दिलं नाही.(REUTERS)
श्रीलंकेनं १७० धावसंख्या उभारल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजीची मदार कर्णधार बाबर आझम आणि फखर जमान यांच्यावर होती. मात्र, हे दोघेही प्रमोद मधुशानच्या लागोपाठच्या चेंडूवर बाद झाले. पाकिस्तानसाठी हा मोठा झटका होता.
(5 / 8)
श्रीलंकेनं १७० धावसंख्या उभारल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजीची मदार कर्णधार बाबर आझम आणि फखर जमान यांच्यावर होती. मात्र, हे दोघेही प्रमोद मधुशानच्या लागोपाठच्या चेंडूवर बाद झाले. पाकिस्तानसाठी हा मोठा झटका होता.(ANI)
श्रीलंका संघाकडून प्रमोद मधुशाननं गोलंदाजीत चमक दाखवली. मधुशाननं चार गडी बाद केले. त्यात कर्णधार बाबर आझम, फखर जमान, इफ्तिकार अहमद या टॉप तीन फलंदाजाचा समावेश होता. याशिवाय मधुशाननं मोहम्मद नवाझचा झेलही टिपला.
(6 / 8)
श्रीलंका संघाकडून प्रमोद मधुशाननं गोलंदाजीत चमक दाखवली. मधुशाननं चार गडी बाद केले. त्यात कर्णधार बाबर आझम, फखर जमान, इफ्तिकार अहमद या टॉप तीन फलंदाजाचा समावेश होता. याशिवाय मधुशाननं मोहम्मद नवाझचा झेलही टिपला.(ANI)
वनिंदू हसरंगा यानं अष्टपैलू कामगिरी केली. त्यानं राजपक्षला दिलेली साथ मोलाची ठरली. इतकंच नव्हे, त्यानं १७ व्या षटकात घेतलेल्या तीन विकेटमुळं श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.  
(7 / 8)
वनिंदू हसरंगा यानं अष्टपैलू कामगिरी केली. त्यानं राजपक्षला दिलेली साथ मोलाची ठरली. इतकंच नव्हे, त्यानं १७ व्या षटकात घेतलेल्या तीन विकेटमुळं श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.  (AP)
कालच्या विजयासह श्रीलंकेनं आशिया चषक स्पर्धेत विजयाचा षटकार ठोकला आहे. भारतानं हा चषक सात वेळा जिंकला आहे. चषक जिंकल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंनी संपूर्ण मैदानाला फेरी मारत आनंद साजरा केला.
(8 / 8)
कालच्या विजयासह श्रीलंकेनं आशिया चषक स्पर्धेत विजयाचा षटकार ठोकला आहे. भारतानं हा चषक सात वेळा जिंकला आहे. चषक जिंकल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंनी संपूर्ण मैदानाला फेरी मारत आनंद साजरा केला.(REUTERS)

    शेअर करा