मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pakistan politics रक्तरंजित पाकिस्तान! आतापर्यंत झालाय या नेत्यांचा खून..

Pakistan politics रक्तरंजित पाकिस्तान! आतापर्यंत झालाय या नेत्यांचा खून..

Nov 04, 2022, 11:14 AMIST

Pakistan politics : पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इमरान खान यांच्यावर काल एका सभेत गोळीबार झाला. हल्लेखोरांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. इमरान खान यांना जीवे ठार मारायचे होते असे हल्लेखोराने कबूल केले आहे. या हल्ल्यामागे कुणी राजकीय व्यक्ति नसल्याचे हल्लेखोराने स्पष्ट केले असून अनेक दिवसांपासून तो या प्रयत्नात असल्याचे त्याने सांगितले आहे. इमरान खान यांनी या हल्ल्यामागे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानचा इतिहास पाहिल्यास रक्तरंजित राजकारण हे नवे नाही. प्रधानमंत्री, राष्ट्रपतींसह अनेक दिग्गजनेते राजकीय कटकारस्थानाचे शिकार झाले आहेत. यात त्यांचे बळी देखील गेले आहे. जाऊन घेऊयात या रक्तरंजीत राजकारणाचा इतिहास.

  • Pakistan politics : पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इमरान खान यांच्यावर काल एका सभेत गोळीबार झाला. हल्लेखोरांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. इमरान खान यांना जीवे ठार मारायचे होते असे हल्लेखोराने कबूल केले आहे. या हल्ल्यामागे कुणी राजकीय व्यक्ति नसल्याचे हल्लेखोराने स्पष्ट केले असून अनेक दिवसांपासून तो या प्रयत्नात असल्याचे त्याने सांगितले आहे. इमरान खान यांनी या हल्ल्यामागे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानचा इतिहास पाहिल्यास रक्तरंजित राजकारण हे नवे नाही. प्रधानमंत्री, राष्ट्रपतींसह अनेक दिग्गजनेते राजकीय कटकारस्थानाचे शिकार झाले आहेत. यात त्यांचे बळी देखील गेले आहे. जाऊन घेऊयात या रक्तरंजीत राजकारणाचा इतिहास.
इमरान खान सध्या धोक्यापासून बाहेर आहेत. त्यांच्यावरील हल्यामुळे पाकिस्तानचा रक्तरंजित राजकारणाचा इतिहास पुन्हा ताजा झाला आहे.  १९४७ मध्ये  पाकिस्तान तयार झाल्यापासूनच रक्तरंजित राजकारण सुरू आहे.
(1 / 9)

राजकारणात शिखरावर पोहचणारी प्रत्येक व्यक्ति ही  कुणाच्या ना कुणाच्या  निशाण्यावर राहिले आहेत. गोळ्या घालण्यापासून ते  फासावर लटकवण्यापर्यन्त अनेक घटना घडल्या आहेत. या सोबत तसेच आत्मघाती हल्ले देखील झाले आहेत.
(2 / 9)

प्रधानमंत्री, राष्ट्रपतींसह अनेक दिग्गजनेते राजकीय कटकारस्थानाचे शिकार झाले आहेत. यात त्यांचे बळी देखील गेले आहे.
(3 / 9)

पहिले पंतप्रधान लियाकत आली खान यांची हत्या :  पाकिस्तानचे पहिले प्रधानमंत्री लियाकत अली खान यांची १६ ऑक्टोबर १९५१ मध्ये हत्या करण्यात आली होती.  रावलपिंडी येथील  कंपनी बाग या ठिकाणी त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. ते  मुस्लिम लीगच्या  जनसभे दरम्यान मंचावर बसले होते.  खान यांची हत्या कुणी केली हे अद्याप कळू शकले नाहीत. लियाकत अली खान हे मोहम्मद अली जिन्ना यांच्या जवळील होते.  लियाकत अली खान असे नेता होते की जे  पाकिस्तानात  कट्टरतावाद पसरू देण्याची त्यांची इच्छा नव्हती.
(4 / 9)

प्रधानमंत्री जुल्फिकार अली भुट्टो यांना चढवले फासावर  : जुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानात लोकप्रिय नेता होते.   जनरल जिया-उल-हक यांना पाकीस्थानात त्यावेळी असलेल्या हुकुमशाहने त्यांना फासावर लटवले होते. कायद्याचे जाणकार याला  न्यायिक हत्या म्हणतात.  जिया १९७८ ते १९८८ दरम्यान पाकिस्तानचे  राष्ट्रपती आणि  सेना प्रमुख होते. त्यांनी जुल्फिकार यांच्यापासून  सत्ता हस्तगत केली होती.  जुल्फिकार हे जनतेतून निवडून आलेले पहिले  प्रधानमंत्री होते.
(5 / 9)

जिया-उल-हक यांचीही हत्या  भुट्टो यांना फासावर लटकवल्यावर ९ वर्षानंतर  जिया उल हक यांचा  देखील  संदिग्ध मृत्यू झाला होता.  असे म्हटले जाते की १९८८ मध्ये  विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू हा एक कट असल्याचे म्हटले जाते. एक कट रचून त्यांचा विमान अपघात करण्यात आला होता. मृत्यूच्या वेळी ते  चीफ मार्शल लॉ ऐडमिनिस्ट्रेटर आणि आर्मी चीफ होते. त्यांच्या हत्तेचे आरोप हे बेनझीर  भुट्टो यांचा भाऊ  मुर्तजा भुट्टो  यांच्यावर लावले जातात. याचे काही ठोस पुरावे सापडले नाही.
(6 / 9)

बेनजीर भुट्टो यांची देखील हत्या  पाकिस्तान बणल्यापासून रक्तरंजित राजकारणाचा खेळ हा सुरू होता. तो थांबण्याची चिन्हे काही दिसत नव्हती.  लियाकत गार्डनमध्ये  ज्या ठिकाणी लियाकत अली खान यांची  हत्या करण्यात आली होती, त्याच ठिकाणी  माजी  प्रधानमंत्री बेनझिर भुट्टो यांची २७ डिसेंबर २००७ ला  गोली मारून हत्या करण्यात आली होती. त्या जुल्फिकार अली भुट्टो यांची ती मुलगी होती.
(7 / 9)

 बेनझिर भुट्टो या दोन वेळा प्रधानमंत्री बनल्या. त्यांची  हत्या करण्याचे प्रयत्न आधी देखील झाले होते. मात्र, सुदैवाने त्या त्यातून वाचल्या. २००७ मध्ये  करसाज येथे झालेल्या स्फोटात तब्बल १८० नागरिक मारले गेले होते. त्या तिसऱ्यांना पंतप्रधान बनणार होत्या. मात्र, त्यांना ठार मारण्यात आले. त्यांच्या हत्तेमागे तालिबान असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानमध्ये पुन्हा राजकीय उलथा पालथी झाल्या. यात संधि साधूंन  जनरल परवेज मुशर्रफ यांनी सत्ता मिळवली. मुशर्रफ यांच्यावर देखील  भुट्टो यांना फोन करून मारण्याची धामी दिल्याचा आरोप आहे.
(8 / 9)

या वर्षी एप्रिल महिन्यात इमरान खान ने देखील त्यांच्या जीवतास धोका असल्याचे सांगितले होते. देशाच्या भल्यासाठी कायम संघर्ष करणार.  त्यांनी संसदेतील अविश्वास प्रस्तावा दरम्यान देखील विरोधी पक्ष हा विदेशांच्या इशाऱ्यावर नाचणारे बाहुले बनल्याचा आरोप केला होता.  पाकिस्तानमध्ये लष्कर हे सरकारवर कायम नजर ठेऊन असते. यामुळे पाकिस्तानमध्ये कायम अस्थिरता असते.
(9 / 9)

    शेअर करा