मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Friendship Day Photo: ही दोस्ती तुटायची नाय! पाहा क्रिकेटच्या मैदानावरील याराना

Friendship Day Photo: ही दोस्ती तुटायची नाय! पाहा क्रिकेटच्या मैदानावरील याराना

Aug 07, 2022, 02:13 PMIST

: ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मैत्रीला समर्पित असून भारतात लोकप्रिय आहे. क्रिकेटच्या मैदानावर काही खेळाडूंची मैत्री इतकी खास आहे, की मैदानाबाहेरही त्यांच्या मैत्रीच्या विशेष चर्चा रंगतात. भारताचा महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना ही जोडीही त्यातलीच एक. याशिवाय भारताच्या महिला क्रिकेट संघाची खेळाडू स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांची मैत्रीही खास आहे.

  • : ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मैत्रीला समर्पित असून भारतात लोकप्रिय आहे. क्रिकेटच्या मैदानावर काही खेळाडूंची मैत्री इतकी खास आहे, की मैदानाबाहेरही त्यांच्या मैत्रीच्या विशेष चर्चा रंगतात. भारताचा महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना ही जोडीही त्यातलीच एक. याशिवाय भारताच्या महिला क्रिकेट संघाची खेळाडू स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांची मैत्रीही खास आहे.
सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनीही भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केली. या दोघांची जोडीने अनेक ऐतिहासिक भागीदारी केल्या आणि भारतीय क्रिकेट संघाला बरेच सामनेही जिंकून दिले. 
(1 / 8)

धोनी- रैना यांनी चेन्नईसाठी १२ वर्षे एकत्र आयपीएल खेळले आहे. धोनीच्या अनेक रणनीतीचा पहिला मोहरा हा रैनाच होता. रैनाकडून बॉलिंग करुन घेणं असो वा मैदानावर कुठेही ठिकाणी फिल्डिंगला करणे असो, धोनीने प्रत्येक वेळी रैनावरच विश्वास दाखवला. 
(2 / 8)

जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत धोनीचा समावेश आहे. यामध्ये रैनाचाही मोठा वाटा आहे. या दोन्ही खेळाडूंनी एकत्रच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीही घेतली होती. यानंतर दोघे सतत भेटत राहतात.
(3 / 8)

एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली ही जोडी आयपीएलमधील सर्वात आवडत्या जोडींपैकी एक होती. दोघेही ११ वर्षे आयपीएलमध्ये एकत्र खेळले. यादरम्यान डिव्हिलियर्स आणि विराटने एकत्र अनेक शानदार भागीदारी केल्या आहेत. तसेच, अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी देखील विराट कोहली आणि डिव्हिलियर्समध्येच झाली आहे. या दोघांनी २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध २२९ धावांची नाबाद भागीदारीही रचली होती.
(4 / 8)

गेल्या काही वर्षांत भारतीय महिला क्रिकेट संघाने त्यांच्या खेळाचा स्तर खूप उंचावला आहे. या सोबतच काही खेळाडूंनीही चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. विशेषत: स्मृती मानधना आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांच्या मैत्रीच्या चर्चाही खूप  रंगतात. स्मृतीचा शांत स्वभाव आणि बबली जेमिमाची मैत्री खूपच खास आहे. या दोघांनीही मैदानावर अनेक वेळा कमाल कामगिरी केली आहे.
(5 / 8)

भारतीय संघातील स्टार्स हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांची मैत्रीही खास आहे. करण जोहरसोबतच्या शोवरुन दोघेही वादात अडकले होते. पण दोघांनीही नंतर शानदार पुनरागमन केले आणि आता ते भारतीय संघाचे महत्त्वाचे सदस्य आहेत. आपली मैत्री दाखवण्यासाठी दोघांनी एकदा आयपीएल सामन्यादरम्यान आपली जर्सी एक्सचेंज केली होती. आयपीएलमध्ये हार्दिक गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे तर राहुल लखनऊचा कर्णधार आहे.
(6 / 8)

ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा आणि मार्कस स्टोईनिस यांची मैत्रीही खास आहे. दोघांच्या मैत्रीच्या चर्चा अनेकदा रंगत असतात. दोघेही मैदानात अनेकदा मस्ती करताना दिसले आहेत. क्रिकेट समालोचकांपासून ते सहकारी खेळाडू आणि परदेशी खेळाडूंमध्येही त्यांच्या मैत्रीबद्दल विशेष चर्चा रंगते.
(7 / 8)

Friendship Day
(8 / 8)
Friendship Day(all photos- social media)

    शेअर करा