मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  साताऱ्यात मूळ गावी एकनाथ शिंदेंचे घर; झाडे आणि डोंगराच्या कुशीत वसलंय गाव

साताऱ्यात मूळ गावी एकनाथ शिंदेंचे घर; झाडे आणि डोंगराच्या कुशीत वसलंय गाव

Jun 25, 2022, 10:47 AMIST

एकनाथ शिंदेंचं मूळ गाव दरे हे अतिशय दुर्गम भागात कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या पलीकडील भागात वसलेलं आहे.

  • एकनाथ शिंदेंचं मूळ गाव दरे हे अतिशय दुर्गम भागात कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या पलीकडील भागात वसलेलं आहे.
शिवसेनेत बंड करून गुवाहाटीत आमदारांना घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदे यांची गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. मुळचे साताऱ्याचे असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गावातील घराचे फोटो आता व्हायरल होत आहेत.
(1 / 8)

एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात दरे हे मूळ गाव आहे. तिथे त्यांचे घरही आहे. दरे गाव हे अतिशय दुर्गम भागात कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या पलीकडील भागात वसलेलं आहे.
(2 / 8)
एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात दरे हे मूळ गाव आहे. तिथे त्यांचे घरही आहे. दरे गाव हे अतिशय दुर्गम भागात कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या पलीकडील भागात वसलेलं आहे.
दरे गावातील बहुतांश लोक हे स्थलांतरीत मजूर आहेत. गावात उत्पन्नाचं नियमित साधन नसल्यानं इथले लोक मुंबई आणि पुण्यात कामासाठी जातात.
(3 / 8)
दरे गावातील बहुतांश लोक हे स्थलांतरीत मजूर आहेत. गावात उत्पन्नाचं नियमित साधन नसल्यानं इथले लोक मुंबई आणि पुण्यात कामासाठी जातात.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या गावातील घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
(4 / 8)
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या गावातील घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी गावात १२.४५ एकर जमीन २१.२१ लाख रुपयांना विकत घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
(5 / 8)
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी गावात १२.४५ एकर जमीन २१.२१ लाख रुपयांना विकत घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)
गेल्या काही वर्षांपासून एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी जातात. अवघी ३० घरे असलेल्या या गावात शाळा आणि रुग्णालय नाही. या सुविधांसाठी गावकऱ्यांना जवळपास रस्ते मार्गाने ४० ते ५० किमी दूर जावं लागतं किंवा नदीतून पलिकडे बोटीने गेल्यास १० किमी अंतरावर तापोळा आहे.
(6 / 8)
गेल्या काही वर्षांपासून एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी जातात. अवघी ३० घरे असलेल्या या गावात शाळा आणि रुग्णालय नाही. या सुविधांसाठी गावकऱ्यांना जवळपास रस्ते मार्गाने ४० ते ५० किमी दूर जावं लागतं किंवा नदीतून पलिकडे बोटीने गेल्यास १० किमी अंतरावर तापोळा आहे.(Hindustan Times)
एकनाथ शिंदे यांनी नदीच्या काठावर आणि घरापासून काही अंतरावर असणाऱ्या टेकडीवर हेलिपॅड बांधलं आहे. एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी हेलिकॉप्टरने येतात अशीही माहिती समजते.
(7 / 8)
एकनाथ शिंदे यांनी नदीच्या काठावर आणि घरापासून काही अंतरावर असणाऱ्या टेकडीवर हेलिपॅड बांधलं आहे. एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी हेलिकॉप्टरने येतात अशीही माहिती समजते.(Hindustan Times)
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी गावात १२.४५ एकर जमीन २१.२१ लाख रुपयांना विकत घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
(8 / 8)
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी गावात १२.४५ एकर जमीन २१.२१ लाख रुपयांना विकत घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.(Hindustan Times)

    शेअर करा