मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्याच्या बोहाडाचा उत्सव पाहिलात का?, आजही जपली जातेय ३०० वर्षांची परंपरा

पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्याच्या बोहाडाचा उत्सव पाहिलात का?, आजही जपली जातेय ३०० वर्षांची परंपरा

Mar 14, 2023, 03:42 PMIST

Bohada Utsav At Palghar : पालघर जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणावर आदीवासी समाज पाहायला मिळतो. बोहाडा हा या समाजाचा एक मोठा उत्सव असतो. या बोहाडात पालघर जिल्ह्यातले सर्व आदीवासी बांधव मोखाडा इथं जमतात आणि हा सण साजरा करतात.

पालघर जिल्ह्यात मोखाड्यात सुमारे ३०० वर्षाची ऐतिहासिक समृद्ध आणि रंगतदार  पंरंपरा असणारा आगळ्या वेगळ्या परंपरेने आणि इथल्या आदीवांसींच्या बोली भाषेत साजरा केला जातो बोहाडा उत्सव. आजही पालघर जिल्ह्यातल्या जव्हार, मोखाडा आणि आसपासच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आदीवासी बांधव पाहायला मिळतात.
(1 / 5)

पूर्वीच्या काळी वीज नसल्यामुळे मशाली पेटवून हा उत्सव साजरा केला जात असे. आजही या वस्त्यांमध्ये म्हणावी तशी वीज नाही. जरी वीज असली तरीही मशाली पेटवूनच हा उत्सव साजरा केला जातो. पुढे देवतांची सोंगं घेतलेले कलाकार, त्यांच्या मागे वाद्यकारी आणि मग जमलेले सर्व आदीवासी बांधव असा हा सोहळा रंगतो. उत्सवाच्या सुरुवातीला गणगौळण म्हटली जाते आणि बोहाडच्या मिरवणुकीला सुरुवात होते.
(2 / 5)

मोखाड्यात आपला व्यापार उदीम करण्यासाठी शेजारच्या नाशिक ,नगर जिल्ह्यातून शिंपी  ,तेली ,ब्राम्हण, वंजारी,तांडेल ,बोदडे ,पाटील ,मुळे ,वाघ ,वैद्य ,डिंगोरे ,गबाळे चुंबळे ,कदम  या समाजाचे लोक येथे स्थायिक झाले. आज ही मंडळीही या बोहाडाच्या उत्सवात आनंदाने सहभागी होतात.
(3 / 5)

खरी कसरत ज्यांना सोंग घ्याचे असते त्यांचा  मेकअप करणे ही असते. ही सर्व जबाबदारी गावातील जाधव, वैदय ,आणि बेदडे या परिवारातील तरुण युवक पार पाडतात आणि या मेकअप मुळे हा बोहाडा  रंगदार होत जातो.  
(4 / 5)
खरी कसरत ज्यांना सोंग घ्याचे असते त्यांचा  मेकअप करणे ही असते. ही सर्व जबाबदारी गावातील जाधव, वैदय ,आणि बेदडे या परिवारातील तरुण युवक पार पाडतात आणि या मेकअप मुळे हा बोहाडा  रंगदार होत जातो.  (हिंदुस्तान टाइम्स)
यावेळी केलेले  नवस फेडण्यासाठी आणि नवीन नवस बोलण्यासाठी भक्त गर्दी  करतात. या उत्सवात जातीभेद विसरून आबालवृद्ध त्यात आपले योगदान यथाशक्ती देत असतात. बोहाडा हा इथल्या ग्रामदेवतांच्या श्रद्धेसाठीही साजरा केला जाणारा सण आहे. आपल्या कुटुंबावर कोणतीही आपदा येऊ नये यासाठी गावकरी देवाला साकडं घालतात.  
(5 / 5)

    शेअर करा