मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photo : आसाममध्ये पुराचा हाहाकार! ५५ जणांचा मृत्यू, लाखो नागरिकांना फटका

Photo : आसाममध्ये पुराचा हाहाकार! ५५ जणांचा मृत्यू, लाखो नागरिकांना फटका

Jun 19, 2022, 08:11 AMIST

Assam Flood : पुरामुळे ३ हजार गावांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे.

  • Assam Flood : पुरामुळे ३ हजार गावांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे.
आसाममध्ये पावसाची संततधार सुरूच असून यामुळे गंभीर अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे.
(1 / 10)
आसाममध्ये पावसाची संततधार सुरूच असून यामुळे गंभीर अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे.(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)
महापुरामुळे १९ लाख नागरिकांना फटका बसला असून आतापर्यंत ५५ जण मृत्यूमुखी पडले आहेत.
(2 / 10)
महापुरामुळे १९ लाख नागरिकांना फटका बसला असून आतापर्यंत ५५ जण मृत्यूमुखी पडले आहेत.(फोटो - अनुवार हजारिका)
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरबाधितांची भेट घेऊन आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री सरमा यांना फोन करून पूरस्थितीची माहिती घेतली.
(3 / 10)
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरबाधितांची भेट घेऊन आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री सरमा यांना फोन करून पूरस्थितीची माहिती घेतली.(फोटो - पीटीआय)
आसाममध्ये शुक्रवारी नाव उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन मुले बेपत्ता झाली आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
(4 / 10)
आसाममध्ये शुक्रवारी नाव उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन मुले बेपत्ता झाली आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.(फोटो - पीटीआय)
राज्यात शेकडो मदत शिबिरांची उभारणी केली असून त्यात एक लाखांहून अधिक पूरबाधितांनी आश्रय घेतला आहे.
(5 / 10)
राज्यात शेकडो मदत शिबिरांची उभारणी केली असून त्यात एक लाखांहून अधिक पूरबाधितांनी आश्रय घेतला आहे.(फोटो - पीटीआय)
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. लाखो नागरिकांनी मदत शिबिरात स्थलांतर केले आहे. 
(6 / 10)
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. लाखो नागरिकांनी मदत शिबिरात स्थलांतर केले आहे. (फोटो - पीटीआय)
पुरामुळे ३ हजार गावांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे.
(7 / 10)
पुरामुळे ३ हजार गावांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे.(फोटो - पीटीआय)
राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितलं की, होजई, नालबारी, बाजाली, ढुबरी, कामरूप, कोकराझार, सोनितपूर जिल्ह्यात मृत्यूची प्रकरणे समोर आली आहेत.
(8 / 10)
राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितलं की, होजई, नालबारी, बाजाली, ढुबरी, कामरूप, कोकराझार, सोनितपूर जिल्ह्यात मृत्यूची प्रकरणे समोर आली आहेत.(फोटो - अनुवार हजारिका)
आसाममध्ये पावसाचा जोर जास्त असून जवळपास सर्वच नद्या धोका पातळीच्या वरती आहेत. काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
(9 / 10)
आसाममध्ये पावसाचा जोर जास्त असून जवळपास सर्वच नद्या धोका पातळीच्या वरती आहेत. काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.(फोटो - एएफपी)
मोठ्या प्रमाणावर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. याशिवाय ४०० हून जास्त जनावरे वाहून गेली असल्याचं सांगण्यात येत आहे.
(10 / 10)
मोठ्या प्रमाणावर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. याशिवाय ४०० हून जास्त जनावरे वाहून गेली असल्याचं सांगण्यात येत आहे.(फोटो - एएफपी)

    शेअर करा