मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नवनिर्वाचित राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैलाच का होतो, काय आहे त्यामागचं कारण?

नवनिर्वाचित राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैलाच का होतो, काय आहे त्यामागचं कारण?

Jul 25, 2022, 10:56 AM IST

    • President Oath Ceremony : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. देशाच्या सरन्यायाधिशांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुर्मू यांचा शपथविधी २५ जुलैला म्हणजे आज झाल्यानं या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.
Oath Taking Ceremony Of Droupadi Murmu (HT)

President Oath Ceremony : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. देशाच्या सरन्यायाधिशांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुर्मू यांचा शपथविधी २५ जुलैला म्हणजे आज झाल्यानं या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.

    • President Oath Ceremony : भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. देशाच्या सरन्यायाधिशांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुर्मू यांचा शपथविधी २५ जुलैला म्हणजे आज झाल्यानं या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.

Oath Taking Ceremony Of Droupadi Murmu : आज मावळते राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपला असून त्यांच्या जागी राष्ट्रपतीपदासाठी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदाची शपथ घेतली आहे. त्यांना देशाचे सरन्यायाधिश रमण्णा यांनी राष्ट्रपतीपदाची आणि गोपनियतेची शपथ दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

दोन मित्र सोबत पीत होते दारू.. पत्नीविषयी अश्लील बोलल्याने झाला वाद अन् घरी येऊन जीवन संपवले

Parcel bomb in Gujarat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हांचा मोठ्या फरकानं पराभव करत द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी आज पदाची शपथ घेतली. परंतु भारताचा कोणताही राष्ट्रपती हा नेहमी २५ जुलैलाच का शपथ घेतो, याचा तुम्ही विचार केलाय का?, चला तर यामागचं नेमकं काय कारण आहे, जाणून घेऊयात.

काय आहे त्यामागचं कारण?

राष्ट्रपती हा भारताचा पहिला नागरिक मानला जातो. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात आतापर्यंत अनेक राष्ट्रपतींनी त्यांच्या पदाची शपथ ही २५ जुलैलाच घेतली होती. सर्वात आधी देशाचे सहावे राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती, तेव्हापासून आतापर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींनी याच तारखेला पदाची शपथ घेतली होती. माजी राष्ट्रपती रेड्डी यांच्यानंतर आतापर्यंत आठ राष्ट्रपतींनी देशाच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. काल २४ जुलैला राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून आज २५ जुलैला मुर्मू या पहिल्या महिला आदिवासी म्हणून देशाच्या राष्ट्रपतीपदी बसल्या आहेत.

२५ जुलैला आतापर्यंत कोणकोणत्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ?

२५ जुलै १९७७ रोजी सर्वप्रथम नीलम संजीव रेड्डी यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर पासून प्रत्येक राष्ट्रपतींनी याच तारखेला आपला कार्यकाळ पूर्ण केला होता. कारण या काळात कोणत्याही राष्ट्रपतीनं राजीनामा दिलेला नाही किंवा कुणाचंही पदावर असताना निधन झालेलं नाही. त्यामुळं राष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची डेट आतापर्यंत एकच राहिलेली आहे. २५ जुलै १९७७ पासून आतापर्यंत नीलम संजीव रेड्डी, ग्यानी झैल सिंह, आर. वेंकटरमन, शंकरदयाल शर्मा, केआर नारायनन, एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभा देविसिंग पाटील, प्रणब मुखर्जी आणि सध्याचे मावळते राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी याच तारखेला शपथ घेतलेली होती, त्यानंतर मुर्मू यांनी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे.