मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Constitution Day : दरवर्षी देशात २६ नोव्हेंबर रोजी का साजरा केला जातो संविधान दिवस?

Constitution Day : दरवर्षी देशात २६ नोव्हेंबर रोजी का साजरा केला जातो संविधान दिवस?

Nov 26, 2022, 01:30 PM IST

  • Why Constitution Day Is Celebrated On 26 November : २६ नोव्हेंबर १९४९ साली भारतीय राज्यघटनेस संविधान सभेने मंजूरी दिली होती आणि त्यानंतर ही घटना २६ जानेवारी १९५० साली देशात स्वीकारण्यात आली.

भारताची घटना (हिंदुस्तान टाइम्स)

Why Constitution Day Is Celebrated On 26 November : २६ नोव्हेंबर १९४९ साली भारतीय राज्यघटनेस संविधान सभेने मंजूरी दिली होती आणि त्यानंतर ही घटना २६ जानेवारी १९५० साली देशात स्वीकारण्यात आली.

  • Why Constitution Day Is Celebrated On 26 November : २६ नोव्हेंबर १९४९ साली भारतीय राज्यघटनेस संविधान सभेने मंजूरी दिली होती आणि त्यानंतर ही घटना २६ जानेवारी १९५० साली देशात स्वीकारण्यात आली.

ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस देशात कोणत्या प्रकारचे कायदे असावे, देशाचं संविधान काय असावं,देशाची घटना काय असावी यावर विचारमंथन करण्यात आलं आणि याची मुख्य जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली. १९४६ साली राष्ट्रपती देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद होते. ही घटना बनवायला साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी लोटला. त्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ साली भारतीय राज्यघटनेस संविधान सभेने मंजूरी दिली होती आणि त्यानंतर ही घटना २६ जानेवारी १९५० साली देशात स्वीकारण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

पतीला म्हटलं गुडबाय अन् नंतर महिलेने ३ वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात मारली गोळी, काय होतं कारण?

Punjab Haryana High Court : वृद्ध सासूबरोबर राहण्यास सुनेचा नकार, हायकोर्टानं मंजूर केला नवऱ्याचा घटस्फोटाचा अर्ज

israel hamas war : इस्रायलनं राफामध्ये हल्ल्याची तयारी करताच हमासनं टेकले गुडघे! म्हणाले, युद्धबंदीसाठी तयार

Viral news : किडनी स्टोन दूर करण्यासाठी दररोज २ लिटर लघवी प्या, गुगल एआयनं दिलं धक्कादायक उत्तर

१ लाख १७ हजार ३६० शब्दांसह जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान

भारतीय संविधान हे १ लाख १७ हजार ३६० शब्दांसह जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारतीय संविधानात आवश्यक तिथे कडकपणा तर गरज असेल तिथे काहीशी लवचिकता ठेवली गेली आहे. संविधन अशा प्रकारे बनवण्यात आलं की काळानुरुप त्यात काही बदल करायचे असल्यास ते सहजपणे केले जाऊ शकतात.

हिंदुस्तान टाइम्सनेही त्यावेळेस दिलेली बातमी

का संविधान दिन महत्वाचा मानला जातो

संविधान दिन म्हणजे ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीचा अंत आणि भारतीय लोकशाहीच्या सूर्याचा उदय. घटना म्हणजे देशाचं एकत्रीकरण,देशातल्या गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांना एकाच कायद्याच्या अधिपत्याखाली आणणं. १९४७ साली देशाला भलेही स्वातंत्र्य मिळालं असेल मात्र २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटना अमलात येईपर्यंत भारतात ब्रिटीश कायद्याचं शासन राहीलं. संविधानातली लवचिकता देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानंतरही त्याचं महत्व अधोरेखित करते. देशाच्या नागरिकांसाठी संविधान का आवश्यक आहे हेही स्पष्ट होतं.

थोडक्यात इतिहास

संविधान दिन २०२२ किंवा राष्ट्रीय कायदा दिवस दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. हा विशेष दिवस म्हणजे १९४९ मध्ये भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारल्याचा ऐतिहासिक दिवस आहे. भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या राज्यघटनेपेक्षा अनेक प्रकारे वेगळी आहे परंतु जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना असल्याने ती इतर देशांपेक्षा खूप वेगळी आहे. आपली राज्यघटना तयार होण्यासाठी २ वर्षांहून अधिक काळ लोटला.