मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Water मुंबईत २९ व ३० नोव्हेंबर रोजी पाण्याचा ‘मेगाब्लॉक’; 'या' भागांतील पाणीपुरवठा बंद

Mumbai Water मुंबईत २९ व ३० नोव्हेंबर रोजी पाण्याचा ‘मेगाब्लॉक’; 'या' भागांतील पाणीपुरवठा बंद

Nov 26, 2022, 11:31 AM IST

  • Water cut in Mumbai: जलवाहिनी जोडणी व दुरुस्तीच्या कामामुळं मुंबई उपनगरातील अनेक भागांत २९ व ३० नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा होणार नाही.

Water Supply

Water cut in Mumbai: जलवाहिनी जोडणी व दुरुस्तीच्या कामामुळं मुंबई उपनगरातील अनेक भागांत २९ व ३० नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा होणार नाही.

  • Water cut in Mumbai: जलवाहिनी जोडणी व दुरुस्तीच्या कामामुळं मुंबई उपनगरातील अनेक भागांत २९ व ३० नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा होणार नाही.

Water cut in Mumbai: मुंबई महापालिकेतर्फे पवई आणि वेरावली तलावातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती व जोडकाम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी (२९ नोव्हेंबर) सकाळी ८.३० वाजेपासून बुधवारी (३० नोव्हेंबर) रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळं या दोन्ही दिवशी मुंबईच्या काही भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. पश्चिम उपनगरातील रहिवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळं या भागातील रहिवाशांनी गरजेपुरता पाणीसाठा करून ठेवावा व काटकसरीनं पाणी वापरावं, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

कोणत्या भागांत राहणार पाणीपुरवठा बंद

एल विभागः अशोक नगर, संजय नगर, सांता नगर, साने गुरुजी नगर, हिमालय सोसायटी, मिलिंद नगर, आंबेडकर नगर, सुंदर नगर, असल्फा, यादव नगर, साकीनाका पोस्ट ऑफिस, दुर्गामाता मंदिर मार्ग, जंगलेश्वर महादेव मंदिर मार्ग, लोयलका, भानुशाली वाडी, कुलकर्णी वाडी, चर्च गल्ली, संघर्ष नगर येथील पाणीपुरवठा २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३० नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत खंडित राहील.

एन विभागः राम नगर, हनुमान नगर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, शंकर मंदीर, जय मल्हार नगर, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षा नगर, ए व बी कॉलनीचा काही परिसर, डी व सी म्युनिसिपल कॉलनी, रायगड विभाग, आनंदगड, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृत नगर, इंदिरा नगर १ व २, अमिनाबाई चाळ, गणेश मैदान, मौलाना कंपाऊंड, हरिपाडा, जगदुषा नगर, कठोडीपाडा, भीमानगर, अल्ताफनगर, गेल्डानगर, गोळीबार मार्ग, नवीन दयासागर, जवाहरभाई प्लॉट, सेवानगर, ओ. एन. जी. सी. कॉलनी, माझगाव डॉक कॉलनी, गंगावाडी गेट नंबर २, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, साईनाथ नगर, पाटीदार वाडी, रामाजी नगर, भटवाडी, बर्वेनगर, काजू टेकडी, अकबरलाला कंपाऊंड, आझादनगर, पारसी वाडी, सोनिया गांधी नगर, खाडी मशीन, गंगावाडीच्या काही परिसरातील पाणीपुरवठा सकाळी ८.३० ते दिनांक ३० नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत खंडित राहील.

एस विभागः गौतम नगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टरपाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे मार्ग, पवई येथील पाणीपुरवठा सकाळी ८.३० ते दिनांक ३० नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत खंडित राहील.

के पूर्व विभागः बांद्रेकर वाडी, फ्रान्सिस वाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर येथील पाणीपुरवठा २९ नोव्हेंबर रोजी खंडित राहील.

के पूर्व विभागः वांद्रे प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर,पास्कल कॉलनी, शंकर वाडी येथील पाणीपुरवठा २९ नोव्हेंबर रोजी खंडित राहील.

के पूर्व विभागः पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटील वाडी, हंजर नगर, झगडा पाडा, पारसी कॉलनी, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ, गुंदवली आझाद मार्ग, सर्वोदय नगर येथील पाणीपुरवठा २९ नोव्हेंबर रोजी खंडित राहील.

के पूर्व विभागः विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, पंथकीबाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोळडोंगरी, जीवा महाले मार्ग, साईवाडी, जीवनविकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, चकाला गावठाण, डोमेस्टीक एअरपोर्ट, विलेपार्लेच्या बहुतांश भागातील पाणीपुरवठा २९ नोव्हेंबर रोजी खंडित राहील.

पी दक्षिण विभागः बिंबीसार नगर येथे २९ नोव्हेंबर रोजी कमी दाबानं पाणीपुरवठा येईल.

पी दक्षिण विभागः राम मंदीर, गोरेगाव पश्चिमेकडील पाणीपुरवठा २९ नोव्हेंबर रोजी खंडित राहील.

के पूर्व विभागः ओल्ड नागरदास मार्ग, मोगरपाडा, न्यू नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलस वाडी परिसर अंबावाडी, गुंदवली परिसरातील पाणीपुरवठा २९ नोव्हेंबर रोजी खंडित राहील

के पूर्व विभागः शिव टेकडी, दत्त टेकडी, मजासगाव टेकडी, आनंद नगर, समर्थ नगर, स्मशान टेकडी, अग्रवाल नगर, श्याम नगर, मेघवाडी, नटवर नगर, रोहिदास नगर, गांधी नगर, सरस्वती बाग, जोगेश्वरी स्थानक मार्ग, नवलकर वाडी, एच. एफ. सोसायटी मार्ग, साईवाडी, मोगरापाडा, इंदिरा नगर येथील पाणीपुरवठा ३० नोव्हेंबर रोजी खंडित राहील.

के पूर्व विभागः महाकाली मार्ग, पेपरबाक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर-ए-पंजाब, बिंद्रा संकुल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर, पूनम नगर, गोनी नगर, पी. एम. जी. पी. कॉलनी, कोकण नगर, संजय नगर येथील पाणीपुरवठा ३० नोव्हेंबर रोजी खंडित राहील.

के पूर्व विभागः  चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, शिवाजी नगर, ए. के. मार्ग, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, मरोळ-मरोशी मार्ग, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांतीनगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी कॉलनी येथे २९ नोव्हेंबर रोजी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल.

के पूर्व विभागः मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, उपाध्याय नगर, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा येथील पाणीपुरवठा ३० नोव्हेंबर रोजी खंडित राहील.

के पूर्व विभागः विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, मरोळ-मरोशी मार्ग, गावदेवी, मरोळ गाव, चर्च मार्ग, कदम वाडी, भंडारवाडा येथे २९ नोव्हेंबर रोजी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल.

के पूर्व विभागः सीप्झ, आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे २९ व ३० नोव्हेंबर रोजी कमी दाबानं पाणीपुरवठा होईल.

एच पूर्व विभागः टीपीएस III, टीपीएसV, आगरीपाडा, सेवा नगर, हनुमान टेकडी, ७ वा रस्ता, खार सबवे, डवरी नगर, शिवाजी नगर, गावदेवी, वाकोला पाईप लाईन मार्ग, नेहरु मार्ग येथील पाणीपुरवठा ३० नोव्हेंबर रोजी खंडित राहील.

एच पश्चिम विभागः सांताक्रुझ (पश्चिम), गजधरबंध, खार पश्चिमचा पश्चिम रेल्वे व डॉ. आंबेडकर मार्ग मधील काही परिसर येथील पाणीपुरवठा २९ नोव्हेंबर सकाळी साडेआठ ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ पर्यंत खंडित राहील.

एच पश्चिम विभागः वांद्रे (पश्चिम) येथे २९ नोव्हेंबर सकाळी साडेआठ ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ पर्यंत कमी दाबानं पाणीपुरवठा होईल.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या