मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : 'भारत जोडो'दरम्यान वाढलेली दाढी राहुल गांधी कधी कापणार? काँग्रेस नेत्याने दिले उत्तर

Rahul Gandhi : 'भारत जोडो'दरम्यान वाढलेली दाढी राहुल गांधी कधी कापणार? काँग्रेस नेत्याने दिले उत्तर

Feb 25, 2023, 10:54 PM IST

  • Rahul Gandhi beard : भारत जोडो यात्रेदरम्यान वाढलेली राहुल गांधींची दाढी अजूनही कायम आहे. यात्रा संपून बरेच दिवस उलटून गेले, पण राहुल गांधींची दाढी आहे तशीच आहे. ती कधी कापणार यावर काँग्रेस नेत्याने उत्तर दिले आहे.

Rahul Gandhi

Rahul Gandhi beard : भारत जोडो यात्रेदरम्यान वाढलेली राहुल गांधींची दाढी अजूनही कायम आहे. यात्रा संपून बरेच दिवस उलटून गेले,पणराहुल गांधींची दाढी आहे तशीच आहे. ती कधी कापणार यावर काँग्रेस नेत्याने उत्तर दिले आहे.

  • Rahul Gandhi beard : भारत जोडो यात्रेदरम्यान वाढलेली राहुल गांधींची दाढी अजूनही कायम आहे. यात्रा संपून बरेच दिवस उलटून गेले, पण राहुल गांधींची दाढी आहे तशीच आहे. ती कधी कापणार यावर काँग्रेस नेत्याने उत्तर दिले आहे.

कन्याकुमारी ते काश्मीर या ३५०० किलोमीटरच्या प्रवासात वाढलेली राहुल गांधींची दाढी अजूनही कायम आहे. यात्रा संपून बरेच दिवस उलटून गेले, पण राहुल गांधींची दाढी आहे तशीच आहे.  अर्थसंकल्पीय अधिवेशनातही ते संसदेत दाढी वाढलेल्या लूकमध्ये दिसून आले. राहुल दाढी कधी करणार असा प्रश्न लोक विचारत आहेत. यावर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी उत्तर दिले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

खेडा यांनी शनिवारी राहुल गांधींच्या दाढीवर भाष्य केले आणि सांगितले की, पत्रकारांनी राहुल गांधी दाढी कधी काढणार असे विचारले होते. ते म्हणाले, राहुल यांच्या दाढीमध्ये त्यांना भारत जोडो यात्रेदरम्यान भेटलेल्या हजारो लोकांच्या कथा आहेत. त्यांची दाढी हे आम्ही पाहिलेल्या प्रवासाचे प्रतीक आहे.

संपूर्ण भारत जोडो यात्रेत राहुल गांधींचा बदललेला लूक चर्चेत होता. याशिवाय त्याच्या हाफ टी-शर्टवरही अनेक प्रश्नोत्तरे झाली होती. खरं तर, कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधी केवळ हाफ टी-शर्टमध्येच दिसले. त्याचवेळी राहुल गांधींनी वाढलेल्या दाढीबाबत सांगितले होते की, त्यांनी यात्रेदरम्यान दाढी न कापण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता यात्रा संपली असून, राहुल आपला नवा लूक कायम ठेवतात की दाढी काढून पुन्हा जुन्या लूकमध्ये जातात हे पाहायचे आहे.

'गौतमदास' वादासाठी दिल्ली विमानतळावर अटक झाल्यानंतर पवन खेरा म्हणाले की त्यांना आणखी काही वेळा ऑफलोड केले गेले तरी त्याची पर्वा नाही. मी घाबरणार नाही, कारण मी माझे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना कधीही घाबरलेले पाहिलेले नाही, असे काँग्रेस नेते म्हणाले. ते म्हणाले की, जेव्हा राहुल गांधी बोलतात, तेव्हा दिल्लीपासून नागपूरपर्यंत नेहरू-गांधी, नेहरू-गांधी यांचा उल्लेख पंतप्रधान करतात. कारण त्यांना काय उत्तर द्यावे हेच कळत नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मूल्यांशी तडजोड करायची नाही, हे सोनिया गांधींनी शिकवले आहे.