मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Joe Biden Video : भर कार्यक्रमात जो बायडन मंचावरच पाय अडखळून पडले, दोन वर्षात पाचवी घटना

Joe Biden Video : भर कार्यक्रमात जो बायडन मंचावरच पाय अडखळून पडले, दोन वर्षात पाचवी घटना

Jun 02, 2023, 12:06 PM IST

    • Joe Biden Falls : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन कोलोरॅडोमध्ये अमेरिकन वायु सेनेच्या एका कार्यक्रमात अचानक कोसळले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Joe Biden Falls

Joe Biden Falls : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन कोलोरॅडोमध्ये अमेरिकन वायु सेनेच्या एका कार्यक्रमात अचानक कोसळले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

    • Joe Biden Falls : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन कोलोरॅडोमध्ये अमेरिकन वायु सेनेच्या एका कार्यक्रमात अचानक कोसळले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कोलोरॅडो : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन अमेरिकन वायु सेनेच्या कार्यक्रमादरम्यान अडखळून खाली पडले. या घटनेत राष्ट्रपती सुरक्षित असून ते जखमी झाले नाहीत अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. तोल जाऊन खाली पडण्याची बायडेन यांची ही पहिली वेळ नाही. गेल्या दोन वर्षात बायडेन हे पाच वेळा खाली पडले आहेट. अमेरिकेत एकीकडे त्यांच्या वयाबद्दल चर्चा सुरू असतांना बायडेन यांनी मात्र, पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

Viral News : हनिमूनसाठी बँकॉकला गेली; पतीचे गुपित पुढे आल्याने हैराण झाली पत्नी, उचलले 'हे' पाऊल! वाचा

Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

 

कोलोरॅडो येथील एअर फोर्स अकादमी पदवीदान समारंभात बायडेन गेले होते. यावेळी अधिकाऱ्यांचा सत्कार करून जात असतांना ८० वर्षीय बायडेन हे स्टेजवर खाली पडले. व्यासपीठावर पोहोचलेल्या राष्ट्रपतींनी आधी विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन केले. त्यानंतर ते आपल्या जागेवर परतत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांची धावपळ झाली. अधिकाऱ्यांनी तातडीने धावत जाऊन बायडेन यांना उचलले. बायडेन यांनी देखील स्वताला सांभाळून पुन्हा आपल्या जागेवर परतले. मंचावरील वाळूच्या पिशव्यांमुळे ही घटना घडल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. खरं तर, अशा दोन पिशव्या टेलीप्रॉम्प्टरला आधार देण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

SSC Result : दहावीचा निकाल जाहीर; ९३.८३ टक्के विद्यार्थी पास, मुलींनी पुन्हा मारली बाजी

यापूर्वी घडलेल्या घटना

२०२३ मध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये देखील जो बायडेन हे तोल जाऊन खाली कोसळले होते. जून २०२२ मध्ये, लॉस एंजेलिसच्या फ्लाइटमध्ये चढत असताना बायडेन कोसळले होते. यापूर्वी मे २०२२ मध्ये, अँड्र्यूज एअर फोर्स बेसवर विमानात चढताना देखील जो बायडेन यांचा तोल गेल्याने ते खाली कोसळले होते. यावेळी येथील हॅडेलच्या मदतीने त्यांनी त्वरीत स्वतःला सावरले. मार्चमध्येच एअरफोर्स वन विमानात बायडेन हे जात असतांना विमानाच्या पायऱ्यांवर ते कोसळले होते.

 

सायकल चालवत असताना पडले

2022 मध्ये अमेरिकेतील डेलावेअर बीचवर सायकल चालवत असतांना बायडेन कोसळले होते. या घटनेचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांचा शूज पायडेलमध्ये अडकल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात होते.

विभाग