मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  SSC Result : दहावीचा निकाल जाहीर; ९३.८३ टक्के विद्यार्थी पास, मुलींनी पुन्हा मारली बाजी

SSC Result : दहावीचा निकाल जाहीर; ९३.८३ टक्के विद्यार्थी पास, मुलींनी पुन्हा मारली बाजी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 02, 2023 11:55 AM IST

SSC Result 2023 : राज्याचा १० वीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. बोर्डाचे अध्यक्ष गोसावी यांनी याबाबत माहिती दिली. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला असून यात कोकण विभागाचा ९८.११ टक्के निकाल लागल्याने कोकण विभागाने बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घटली आहे.

Pune HSC Result
Pune HSC Result (HT PHOTO)

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल एकूण ९३. ८३ टक्के लागला आहे. यात कोकण विभागाची टक्केवारी जास्त म्हणजे ९८.११ टक्के तर नागपूर विभागाची टक्केवारी सर्वात कमी ९२.५ टक्के लागला आहे. एकूण १४, ३४,८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना आज दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत ९५.८७  टक्के मुली पास झाल्या आहेत. तर  टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात ९८.११ टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.

The Kerala Story: द केरळ स्टोरीला खतरनाक म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांवर मनोज तिवारीची सडकून टीका

राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती.

Raj Thackeray : मराठी जनांनी 'ही' शपथ घ्यावी; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं राज ठाकरे यांचं आवाहन

या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. तर नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी घटली आहे.

विभागवार निकाल पुढील प्रमाणे

पुणे ९५.६४, नागपूर  ९२.०५, औरंगाबाद ९३.२३, मुंबई ९३.६६, कोल्हापूर ९६.७३,अमरावती ९३.२२, नाशिक ९२.२२, लातूर ९२.६७, कोकण ९८.११ विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. खालील अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

या लिंकवर पाहा निकाल

mahresult.nic.in

https://ssc.mahresults.org.in

http://sscresult.mkcl.org

 

IPL_Entry_Point

विभाग