मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bhojpur : मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या विश्वासू नेत्यावर जीवघेणा हल्ला; पोलिसांकडून आरोपींची धरपकड

Bhojpur : मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या विश्वासू नेत्यावर जीवघेणा हल्ला; पोलिसांकडून आरोपींची धरपकड

Jan 30, 2023, 11:32 PM IST

    • Jagdishpur Violence : ओडिशातील मंत्र्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विश्वासू नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
Mob Attack On Upendra Kushwaha In Jagdishpur (HT)

Jagdishpur Violence : ओडिशातील मंत्र्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विश्वासू नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

    • Jagdishpur Violence : ओडिशातील मंत्र्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विश्वासू नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Mob Attack On Upendra Kushwaha In Jagdishpur : ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोरदास यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता बिहारमध्येही एका राजकीय नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जनता दल यूनायटेडचे आमदार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उपेंद्र कुशवाहा यांच्या वाहनावर अज्ञात आरोपींनी तुफान दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं बिहारमध्ये खळबळ उडाली असून त्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भोजपूर जिल्ह्यात एका कार्यक्रमाला जात असताना उपेंद्र कुशवाहा यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Netanyahu Arrest Warrant : बेंजामिन नेतान्याहूंना होणार अटक! आयसीसीच्या वॉरंटमुळे अमेरिका संतप्त, दिला 'हा' इशारा

Viral News : लग्नपत्रिकेवर मोदींचे नाव लिहिणे वराला पडले महागात! अक्षता पडण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने केली 'ही' कारवाई

VIDEO : अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याने घेतली सेल्फी अन् तोडली कारची काच, अभिनेत्याने डोक्यावर मारला हात

Amrit Bharat Express : रेल्वे प्रवाशांना खूशखबर! देशातील ८० मार्गांवरून दररोज धावणार अमृत भारत एक्सप्रेस

मिळालेल्या माहितीनुसार, जेडीयूचे आमदार उपेंद्र कुशवाहा हे भोजपूर जिल्ह्यातील जगदीशपूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. परंतु त्यांच्या वाहनांचा ताफा नायका टोल नाक्यावरील वळणावर आला असता अज्ञात जमावानं त्यांच्या वाहनासह इतर वाहनांवर जोरदार दगडफेक केली. याशिवाय हल्लेखोरांनी उपेंद्र कुशवाहा यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत उपेंद्र कुशवाहा यांना सुरक्षितस्थळी हलवलं. दगडफेकीच्या घटनेत कुशवाहा यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसल्याची माहिती आहे.

अज्ञात लोकांनी वाहनावर दगडफेक केल्यानंतर उपेंद्र कुशवाहा यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेयर करत म्हटलं आहे की, जगदीशपूरमध्ये काही समाजकंटकांनी माझ्यावर आणि माझ्या वाहनांवर दगडफेक केली आहे. परंतु पोलीस आणि सुरक्षारक ज्यावेळी घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी हल्लेखोरांनी तेथून पळ काढल्याचं कुशवाहा म्हणाले. उपेंद्र कुशवाह यांच्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, मला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, जर काही घडलं असेल त्यातील आरोपींविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असं तेजस्वी यादव म्हणाले.

विभाग