मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार योग्य; अन्यथा ‘रबर स्टॅम्प’साठी तर अनेक लोकं रांगेत

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार योग्य; अन्यथा ‘रबर स्टॅम्प’साठी तर अनेक लोकं रांगेत

Jun 14, 2022, 12:59 PM IST

    • देशाचा राष्ट्रपती निवडायचा असेल तर शरद पवार हे सध्या योग्य उमेदवार असून जर ‘रबर स्टॅम्प’ निवडायचा असेल तर अनेक लोकं रांगेत उभे आहे, अस मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
Sharad Pawar is the right candidate for President Post: Sanjay Raut

देशाचा राष्ट्रपती निवडायचा असेल तर शरद पवार हे सध्या योग्य उमेदवार असून जर ‘रबर स्टॅम्प’ निवडायचा असेल तर अनेक लोकं रांगेत उभे आहे, अस मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

    • देशाचा राष्ट्रपती निवडायचा असेल तर शरद पवार हे सध्या योग्य उमेदवार असून जर ‘रबर स्टॅम्प’ निवडायचा असेल तर अनेक लोकं रांगेत उभे आहे, अस मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

देशाचा राष्ट्रपती निवडायचा असेल तर शरद पवार हे सध्या योग्य उमेदवार असून जर ‘रबर स्टॅम्प’ निवडायचा असेल तर अनेक लोकं रांगेत उभे आहे, अस मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राऊत सध्या अयोध्येत आहेत. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उद्या दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून उमेदवार ठरवण्यासाठी या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत शरद पवार सामिल होणार आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही. परंतु शिवसेनेचा ज्येष्ठ नेता या बैठकीत सामिल होणार असल्याचे राऊत म्हणाले.

राज्यकर्त्यांनी मोठं मन करून शरद पवारांना राष्ट्रपती करावं

शरद पवार यांचा संसदीय कामाचा अनुभव मोठा आहे. ते देशाच्या सर्वोच्च पदावर उत्तम कारभार करू शकतात, असं सांगत सत्ताधारी राज्यकर्त्यांनी मोठं मन करून शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा, असं राऊत म्हणाले. मात्र शरद पवार यांनी त्यांच्या उमेदवारीला मान्यता दिली तरच पुढे चर्चा होऊ शकेल, असंही राऊत म्हणाले.

शरद पवारांच्या भेटीगाठीचं सत्र

पुढील महिन्यात १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. यापार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीविषयी चर्चा केली होती. शिवाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रपदी पदासाठीच्या उमेदवारीला समर्थन करणारे ट्विट केले होते. ‘राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांचे नाव पुढे येत असेल तर कॉंग्रेसचा त्याला पाठिंबा असेल. महाराष्ट्राची व्यक्ती देशाचे नेतृत्व करणार असेल तर मला याचा आनंदच होईल’ असे ट्विट पटोले यांनी केले होते.