मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UPI Down Today : ‘फोन पे-गुगल पे’ वर पेमेंट होत नसल्यानं लोक वैतागले, सोशल मीडियावर संतापाची लाट

UPI Down Today : ‘फोन पे-गुगल पे’ वर पेमेंट होत नसल्यानं लोक वैतागले, सोशल मीडियावर संतापाची लाट

Jan 01, 2023, 06:28 AM IST

    • UPI Down Today : फोन पे आणि गुगल पे या पेमेंट्स अॅपची सेवा मध्यरात्रीपासून अचानक ठप्प झाली आहे. त्यामुळं पेमेंट होत नसल्यामुळं अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.
UPI Transaction Issue Today (HT)

UPI Down Today : फोन पे आणि गुगल पे या पेमेंट्स अॅपची सेवा मध्यरात्रीपासून अचानक ठप्प झाली आहे. त्यामुळं पेमेंट होत नसल्यामुळं अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

    • UPI Down Today : फोन पे आणि गुगल पे या पेमेंट्स अॅपची सेवा मध्यरात्रीपासून अचानक ठप्प झाली आहे. त्यामुळं पेमेंट होत नसल्यामुळं अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

UPI Transaction Issue Today : भारतासह जगभरात नववर्षाचं स्वागत केलं जात असतानाच मध्यरात्रीपासून गुगल पे आणि फोन पे ची सेवा अचानक ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिलेब्रेशनच्या मूडमध्ये असलेल्या लोकांना अचानक संताप आणणाऱ्या या बातमीमुळं लोक हैराण झाले आहेत. या प्लॅटफॉर्मवरून अनेकांचे व्यवहार होत नाहीये. मध्यरात्रीपासून पेमेंट करण्यात अडचणी येत असल्यानं युजर्सनी ट्वीटरवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Archana express accident : धक्कादायक! धावत्या ट्रेनपासून वेगळे झाले इंजिन, ३ किमी अंतरावर जाऊन थांबले; मोठा अपघात टळला

ऑस्ट्रेलियात नाईट आऊटदरम्यान महिला खासदाराला ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल, पोस्ट करत मांडली व्यथा

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

Viral News : हनिमूनसाठी बँकॉकला गेली; पतीचे गुपित पुढे आल्याने हैराण झाली पत्नी, उचलले 'हे' पाऊल! वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीआय सर्व्हर डाऊन झाल्यानंतर असंख्य लोकांनी फोन पे आणि गुगल पे कंपनीला टॅग करत तक्रारी करायला सुरुवात केली. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा मनस्ताप कशासाठी, असा सवाल वापरकर्त्यांनी दोन्ही कंपन्यांना विचारला आहे. फक्त भारतातूनच नाही तर विदेशातूनही अनेक लोक फोन पे आणि गुगल पे चालत नसल्याची तक्रार ट्वीटरवर करत असल्यानं आता पेमेंट्सची सेवा पूर्ववत करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे.

यूपीआय ही ही रिअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे. भारतातील तब्बल ६० टक्के किरकोळ व्यवहार यूपीआयद्वारे होत आहेत. कमी काळात अगदी लहान किंवा मोठ्या रकमेचा व्यवहारही या प्लॅटफॉर्मवरून करता येतो. त्यामुळं आता नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी फोन पे आणि गुगल पे ची सेवा ठप्प झाल्यानं युजर्सला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नेमकं काय झालंय, किंवा सेवा कधीपर्यंत पुन्हा सुरू करण्यात येईल, याबाबत दोन्ही कंपन्यांकडून अद्याप स्पष्टीकरण आलेलं नाही.