मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Earthquake : नववर्षाच्या पहिल्याच रात्री दिल्लीत भूकंपाचे धक्के; जल्लोषावेळी लोकांमध्ये घबराट

Delhi Earthquake : नववर्षाच्या पहिल्याच रात्री दिल्लीत भूकंपाचे धक्के; जल्लोषावेळी लोकांमध्ये घबराट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 01, 2023 06:01 AM IST

earthquakes in delhi : मध्यरात्री राजधानी दिल्लीतील अनेक ठिकाणी न्यू इयरचं सेलिब्रेशन सुरू असतानाच शहरात भूकंप झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

earthquakes in haryana and delhi
earthquakes in haryana and delhi (HT)

earthquakes in haryana and delhi : भारतासह जगभरात अनेक लोक नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करत असतानाच मध्यरात्री दिल्लीत भूकंप झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री १ वाजून १९ मिनिटांनी दिल्लीसह हरयाणातील काही शहारांमध्ये जमिनीला हादरे बसल्यानं नववर्षाचा जल्लोष करत असलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनं याबाबतचं वृत्त दिलं असून त्यामुळं घाबरलेल्या अनेक लोकांनी रात्र जागून काढली आहे. या भूकंपाच्या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवीत किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीसह हरयाणातील काही शहरांमध्ये मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाची तिव्रता ३.८ रिश्टर स्केल असल्याची माहिती सिस्मोलॉजी विभागानं दिली आहे. संपूर्ण दिल्ली राजधानी क्षेत्रासह हरयाणातील रोहतक, महेंद्रगड, गुरुग्रामसह इतर परिसरातही धक्के बसले आहेत. उत्तराखंडच्या डेहराडूनपासून तर हरयाणाच्या महेंद्रगडपर्यंत जमिनीत फॉल्ट लाईन आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यात भेगा पडत असल्यानं लाईनमध्ये कंपन निर्माण होत आहे. त्यामुळं उत्तराखंड, दिल्ली आणि हरयाणातील काही भागांमध्ये सातत्यानं भूकंपाच्या घटना समोर आलेल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीत भूकंपाचे हादरे बसले होते. त्यामुळं आता ऐन नववर्षाचा जल्लोष सुरू असतानाच शहरात भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय अनेक लोकांनी नव्या वर्षाचं सेलिब्रेशन सोडून कुटुंबियांना घराबाहेर काढलं. त्यानंतर पुन्हा भूकंप होईल, या भीतीनं अनेक लोकांनी संपूर्ण रात्र मोकळ्या आभाळाखाली बसून काढल्याची माहिती आहे.

IPL_Entry_Point

विभाग