मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SAIL Recruitment: स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ऑपरेटर-कम-टेक्निशियन पदांसाठी भरती; 'अशी' होणार निवड!

SAIL Recruitment: स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ऑपरेटर-कम-टेक्निशियन पदांसाठी भरती; 'अशी' होणार निवड!

Feb 29, 2024, 05:18 PM IST

    • स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ऑपरेटर-कम-टेक्निशियन पदांसाठी भरती सुरू झाली आहे.
Jobs HT

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ऑपरेटर-कम-टेक्निशियन पदांसाठी भरती सुरू झाली आहे.

    • स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ऑपरेटर-कम-टेक्निशियन पदांसाठी भरती सुरू झाली आहे.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, सेल येथे ऑपरेटर-कम-टेक्निशियन (ट्रेनी) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरून sail.co.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेत संस्थेतील ३४१ पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

या भरतीसाठी २६ फेब्रुवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, १८ मार्च २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.  या भरतीसाठी वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २८ वर्षे ठेवली आहे. तर, मागासवर्गीयांना वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवारांची पात्रता, निवड प्रक्रिया इतर महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

निवड प्रक्रिया

पात्र उमेदवारांना संगणक आधारित चाचणी (सीबीटी) हिंदी/ इंग्रजीमध्ये देणे आवश्यक आहे. सीबीटीमध्ये डोमेन नॉलेजवर ५० आणि अॅप्टिट्यूड टेस्टवर ५० अशा दोन विभागात १०० ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न असतील. सीबीटीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. वरील पदांसाठी सीबीटीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या क्रमाने कौशल्य चाचणीसाठी प्रत्येक पद/शाखेसाठी १:३ या प्रमाणात शॉर्टलिस्ट केले जाईल.

अर्ज शुल्क

सर्वसाधारण / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज आणि प्रक्रिया शुल्क 500/- रुपये आणि एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी / ईएसएम / विभागीय उमेदवारांसाठी प्रक्रिया शुल्क 200/- रुपये आहे. उमेदवारांनी नेट बँकिंग / क्रेडिट कार्ड / एटीएम-कम-डेबिट कार्डद्वारे अर्ज आणि प्रक्रिया शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्क इतर कोणत्याही मार्गाने वसूल केले जाणार नाही.

ECIL Recruitment 2024: ईसीआयएलमध्ये विविध पदांसाठी भरती; महिन्याला ५५ हजार पगार मिळणार!

अर्ज प्रक्रिया

  • सर्व प्रथम, उमेदवारांनी सेलची अधिकृत वेबसाइट्स https://sail.ucanapply.com/ वर भेट द्यावी.
  • त्यानंतर उमेदवारांनी मुख्यपृष्ठावर ऑनलाइन अर्ज पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • मग अर्ज फार्ममधील सर्व आवश्यक माहिती द्या.
  • पुढे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज फी भरावी
  • त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावी.
  • आठवणीने अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.