मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SC On Abortion Law : अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

SC On Abortion Law : अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Sep 29, 2022, 12:18 PM IST

    • SC On Abortion Law : ज्या महिलांना गर्भपात करण्यासाठी बळजबरी केली जात असेल तर त्या प्रकरणात बलात्काराच्या गुन्ह्याखाली कारवाई केली जाईल, असंही कोर्टानं निकाल देताना म्हटलं आहे.
supreme court judgment on abortion (HT_PRINT)

SC On Abortion Law : ज्या महिलांना गर्भपात करण्यासाठी बळजबरी केली जात असेल तर त्या प्रकरणात बलात्काराच्या गुन्ह्याखाली कारवाई केली जाईल, असंही कोर्टानं निकाल देताना म्हटलं आहे.

    • SC On Abortion Law : ज्या महिलांना गर्भपात करण्यासाठी बळजबरी केली जात असेल तर त्या प्रकरणात बलात्काराच्या गुन्ह्याखाली कारवाई केली जाईल, असंही कोर्टानं निकाल देताना म्हटलं आहे.

supreme court judgment on abortion : देशातील अविवाहित महिलांनाही आता २४ आठवड्याच्या काळात गर्भपाताचा अधिकार असल्याचा निकाल सुप्रिम कोर्टानं दिला आहे. वैवाहिक बलात्काराच्या एका खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं अविवाहित महिलांना कायदेशीर गर्भपाताचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आता ज्या अविवाहित महिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये किंवा सहमतीनं शारीरिक संबंधातून गर्भवती राहिलेल्या आहे, त्यांना कोर्टाच्या या निर्णयामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी कायद्यात फक्त विवाहित महिलांनाच गर्भपाताचा अधिकार देण्यात आलेला होता. त्यानंतर आता या कायद्यात अविवाहित महिलांचाही समावेश करण्यात येणार असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Covishield : कोव्हिशिल्डमुळे मानवी शरीरावर गंभीर परिणाम! हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता; लस घेणाऱ्यांचे टेन्शन वाढले

Netanyahu Arrest Warrant : बेंजामिन नेतान्याहूंना होणार अटक! आयसीसीच्या वॉरंटमुळे अमेरिका संतप्त, दिला 'हा' इशारा

Viral News : लग्नपत्रिकेवर मोदींचे नाव लिहिणे वराला पडले महागात! अक्षता पडण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने केली 'ही' कारवाई

VIDEO : अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याने घेतली सेल्फी अन् तोडली कारची काच, अभिनेत्याने डोक्यावर मारला हात

कौटुंबिक कलहावेळी पतीनं पत्नीवर लैंगिक हल्ला केला असेल तर तो बलात्काराच्या गुन्हाखाली येईल, असाही निकाल कोर्टानं दिला आहे. याशिवाय महिलेची इच्छा नसताना तिला गर्भवती राहण्यास भाग पाडलं जात असेल तर हा प्रकार बलात्कार मानला जाईल, असं नमूद करताना अविवाहित महिलांना २४ आठवड्यांच्या आत गर्भपाताची परवानगी देण्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

खुशबू सैफी नावाच्या एका महिलेनं वैवाहिक बलात्काराच्या एका प्रकरणाबाबत हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिला आहे. याशिवाय एखाद्या महिलेवर बलात्कार करण्यात आला असेल तर त्या पीडितेला गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं याआधीच दिलेला आहे. त्यानंतर आता अविवाहित महिलांनाही त्यांच्या मर्जीनुसार २४ आठवड्यांच्या आत गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे.