मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chhattisgarh Naxal Arrest : नोटा बदलायला आलेल्या नक्षल्यांना अटक, छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई

Chhattisgarh Naxal Arrest : नोटा बदलायला आलेल्या नक्षल्यांना अटक, छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई

May 27, 2023, 08:53 AM IST

    • Chhattisgarh Naxal Arrest : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Chhattisgarh Naxal Arrest (HT)

Chhattisgarh Naxal Arrest : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    • Chhattisgarh Naxal Arrest : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Chhattisgarh Naxal Arrest : काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहे. नागरिकांना नोटा बदलण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. परंतु आता नोटा बदलण्यासाठी आलेल्या दोन नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बिजापूर शहरात पोलिसांनी दोन नक्षल्यांना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळं छत्तीसगडसह देशभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळं आता नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू

Hindu Population : भारतात हिंदूच्या लोकसंख्येत गतीने घट तर मुस्लिम लोकसंख्या वृद्धी, वाचा अन्य अल्पसंख्यांकांची स्थिती

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या बिजापुरमधील बँकेत नोटा बदलण्यासाठी काही नक्षलवादी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बिजापूर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही नक्षलवाद्यांना बँकेतून ताब्यात घेतलं. नक्षल्यांकडून सहा लाखांची कॅश, ११ पासबुक आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी बिजापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. गजेंद्र मडवी आणि लक्ष्मण कुंजम अशी आरोपी नक्षलवाद्यांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी या दोन्ही नक्षल्यांवर लाखोंची बक्षिसं ठेवलेली होती.

पोलिसांनी अटक केल्यानंतर नक्षलवाद्यांनी देशविरोधी कारवायात सामील झाल्याची कबुली दिली आहे. तसेच पोलिसांनी आरोपींकडील राष्ट्रविरोधी पोस्टर्स जप्त केले असून त्यांच्यामार्फत अन्य नक्षलवाद्यांची माहिती काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच छत्तीसगड पोलिसांनी बस्तर जिल्ह्यात कारवाई करत चार नक्षल्यांना अटक केली होती. त्यानंतर आता बिजापूर जिल्ह्यात नोटा बदलण्यासाठी आलेल्या दोन नक्षल्यांना अटक करण्यात आल्यामुळं खळबळ उडाली आहे.