मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Marathi News Updates 27 May 2023 Maharashtra Breaking News Live Updates Today

Live News Updates 27 May 2023 (HT)

Live News Updates 27 May 2023 : मुंबईत पेडर रोडवरील १४ मजली इमारतीमध्ये भीषण आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

Fire at Breach Candy Apartments mumbai : मुंबईतील पेडर रोडवरील ब्रीच कँडी अपार्टमेंटला आग लागली. १४ मजली इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग लागली.

Sat, 27 May 202306:03 PM IST

मुंबईत पेडर रोडवरील १४ मजली इमारतीला भीषण आग

मुंबईतील पेडर रोडवरील ब्रीच कँडी अपार्टमेंटला आग लागली. १४ मजली इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाने सांगितले की, लेव्हल १ प्रकारची ही आग होती. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.

Sat, 27 May 202304:53 PM IST

महावितरणच्या मुख्य अभियंतापदी डॉ. मुरहरी सोपानराव केळे रुजू

महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी डॉ. मुरहरी सोपानराव केळे मंगळवारी (२३ मे) रुजू झाले. याआधी ते महावितरणच्या मुंबईतील सांघिक कार्यालयात कार्यरत होते.

वीज वितरणाच्या क्षेत्रातील तज्ञ व विश्लेषक म्हणून ओळख असणारे डॉ. केळे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील केळेवाडीचे रहिवासी आहेत. तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये ते कनिष्ठ अभियंता म्हणून १९९१ मध्ये रुजू झाले.

Sat, 27 May 202312:24 PM IST

परभणीत चौरीच्या संशयातून जमावाची तिघांना मारहाण, एकाचा मृत्यू

परभणीत चोरीच्या संशयावरुन तिघांना मारहान करण्यात आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोनजण जखमी झाले आहेत.

Sat, 27 May 202308:29 AM IST

Go First Airline : गो फर्स्टची विमानसेवा 30 मे पर्यंत रद्द, प्रवाशांना बुकिंगचा परतावा मिळणार

Go First Airline : गो फर्स्ट एअरलाइन्सने कंपनीच्या सर्व विमानांचं उड्डाण येत्या ३० मे पर्यंत रद्द केलं आहे. डीजीसीएने कंपनीच्या कर्मचाऱ्यांची आणि विमानांची माहिती मागवली आहे. त्यानंतर तातडीने विमानसेवा रद्द करत प्रवाशांना परतावा देण्यात येणार असल्याचं कंपनीने ट्वीट करत म्हटलं आहे.

Sat, 27 May 202308:29 AM IST

University Chancellor : राज्यातील दोन विद्यापीठांना मिळणार नवे कुलगुरू, शर्यतीतील अनेक दिग्गजांची नावं

University Chancellor Interviews : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी निवड समितीने २० जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यातील पाच नावं राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी २७ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यातीलही पाच नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळं आता येत्या काही दिवसांत राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून दोन्ही विद्यापीठांच्या कुलगुरुपदाचा फायनल निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Sat, 27 May 202307:00 AM IST

Pune Loksabha Bypoll : पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा, अजित पवार म्हणाले...

Pune Loksabha Bypoll News : येत्या काही दिवसांत पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. कारण आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 'ज्याची ताकद जास्त त्याला पुण्याची जागा मिळेल', असं म्हणत पुणे लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला आहे.

Sat, 27 May 202303:27 AM IST

समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आजपासून वाहनचालकांच्या सेवेत

महाराष्ट्रासह देशभरातील बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं आहे. त्यानंतर आजपासून शिर्डी ते भरवीर या मार्गावरील ८० किमीच्या दुसरा टप्प्यातील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी नागपूर ते शिर्डी दरम्यानची वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Sat, 27 May 202312:57 AM IST

Gopichand Padalkar : पुण्यात लव्ह जिहाद झाल्याचा आमदार पडळकरांचा दावा

Pune News : पुणे जिल्ह्यातील मंचर शहरात लव्ह जिहादचं प्रकरण समोर आल्याचा धक्कादायक दावा भाजपाचे आमदार गोपींचद पडळकर यांनी केला आहे. आरोपीने मुलीला उत्तर प्रदेशात नेवून तिच्यावर अत्याचार केला, त्यामुळं पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आमदार पडळकर यांनी केली आहे.

Sat, 27 May 202312:57 AM IST

Sameer Wankhede : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे पत्नीसह चैत्यभूमीवर

Sameer Wankhede on Chaityabhumi : एनसीबीचे वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे हे पत्नी क्रांती रेडकरसह चैत्यभूमीवर दाखल झाले आहे. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतल्यानंतर अनेक मान्यवरांची भेट समीर वानखेडे यांनी घेतली आहे.

Sat, 27 May 202312:56 AM IST

Parliament Building Inauguration : संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशीचं कुस्तीपटू करणार आंदोलन, आज महिलांची महापंचायत

Parliament Building Inauguration : भाजपा खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत कारवाईची मागणी करणाऱ्या कुस्तीपटूंनी आता थेट नव्या संसदेला घेराव घालण्याची तयारी सुरू केली आहे. उद्या नव्या संसदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यातच पंजाब आणि हरयाणातील महिला कुस्तीपटूंसाठी महापंचायत घेणार आहे. त्यामुळं यावरून राजधानीत राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

Sat, 27 May 202312:56 AM IST

PCMC News : पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ६०० इमारती धोकादायक

PCMC News : पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील अतिशय धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार ६०० इमारती राहण्यायोग्य नसल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. तसेच अनेक जुने वाडे आणि जुन्या इमारती पावसाळ्यात पडण्याची शक्यता असल्यामुळं पालिकेने धोकादायक इमारती पाडण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

Sat, 27 May 202312:54 AM IST

HC Mumbai : मशिदींवरील भोंग्यावरून हायकोर्टानं मुंबई पोलिसांना फटकारलं!

Mumbai Police : मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा राजकीय होत असताना आता मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारलं आहे. मुंबईत ध्वनी प्रदुषण होत असताना त्यावर कारवाई न करणं हा कोर्टाचा अपमान आहे. त्यामुळं या प्रकरणांवर काय करवाई करण्यात आली, याची माहिती सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने उपायुक्तांना दिले आहे.