मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  IndiGo Flight : गुटखा थुंकायचाय खिडकी उघडा, विमानात प्रवाशाची विचित्र मागणी; एअर होस्टेस चक्रावली!

IndiGo Flight : गुटखा थुंकायचाय खिडकी उघडा, विमानात प्रवाशाची विचित्र मागणी; एअर होस्टेस चक्रावली!

Jan 24, 2023, 07:49 PM IST

    • IndiGo Flight : प्रवाशानं गुटखा थुंकण्यासाठी उडत्या विमानाची खिडकी उघडण्याची विचित्र मागणी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IndiGo Flight Viral Video (HT)

IndiGo Flight : प्रवाशानं गुटखा थुंकण्यासाठी उडत्या विमानाची खिडकी उघडण्याची विचित्र मागणी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    • IndiGo Flight : प्रवाशानं गुटखा थुंकण्यासाठी उडत्या विमानाची खिडकी उघडण्याची विचित्र मागणी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IndiGo Flight Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील अनेक गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मद्यधुंद प्रवाशानं महिलेवर मूत्रविसर्जन केल्याची घटना ताजी असतानाच आता एका प्रवाशानं गुटखा थुंकण्यासाठी थेट विमानाची खिडकी उघडण्याची विचित्र मागणी केली आहे. इंडिगो कंपनीच्या विमानात हा धक्कादायक प्रकार घडला असून त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं आता विमानात प्रवास करणाऱ्या आणखी एका प्रवाशानं विचित्र कृत्य केल्याची घटना समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Archana express accident : धक्कादायक! धावत्या ट्रेनपासून वेगळे झाले इंजिन, ३ किमी अंतरावर जाऊन थांबले; मोठा अपघात टळला

ऑस्ट्रेलियात नाईट आऊटदरम्यान महिला खासदाराला ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल, पोस्ट करत मांडली व्यथा

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

गोविंद शर्मा नावाच्या इन्स्टाग्राम युजरने घटनेचा व्हिडिओ शेयर केला असून इंडिगोच्या विमानात बसलेल्या एका प्रवाशानं अचानक एअर होस्टेसला गुटखा थुंकण्याची मागणी केली. त्यामुळं एअर होस्टेससह विमानातील इतर प्रवाशी जोरजोरात हसायला लागले. प्रवाशाच्या तोंडात गुटखा भरलेला होता तर दुसरीकडे तो हातात तंबाखू मळत होता. परंतु एअर होस्टेसने प्रवाशाच्या विचित्र मागणी हसण्यावारी नेत त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कहून दिल्लीसाठी येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका दारुड्या प्रवाशानं महिलेवर मूत्रविसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यावेळी महिलेच्या कपड्यांसहित तिचं सामानावरही आरोपीनं लघवी केली होती. तक्रार करूनही क्रू मेंबर्सनं आरोपीवर कोणतीही कारवाई न केल्यामुळं पीडित महिलेनं एअर इंडिया समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहून आरोपी प्रवाशावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर एअर इंडियानं आरोपी प्रवाशावर ३० दिवसांची प्रवासबंदी घातली होती. त्यानंतर आता इंडिगोच्या विमानात एका प्रवाशानं गुटखा थुंकण्यासाठी थेट खिडकी उघडण्याची मागणी केल्यामुळं खळबळ उडाली आहे.