मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचा २० व्या मजल्यावरून पडून मृत्यू

OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचा २० व्या मजल्यावरून पडून मृत्यू

Mar 10, 2023, 07:34 PM IST

  • Oyo founder Ritesh Agarwal’s father dies : इमारतीच्या २० व्या मजल्यावरून खाली पडल्यानं रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Ritesh Agarwal Father Ramesh Agarwal Passed Away In Gurugram (HT)

Oyo founder Ritesh Agarwal’s father dies : इमारतीच्या २० व्या मजल्यावरून खाली पडल्यानं रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Oyo founder Ritesh Agarwal’s father dies : इमारतीच्या २० व्या मजल्यावरून खाली पडल्यानं रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Ritesh Agarwal Father Ramesh Agarwal Passed Away In Gurugram : भारतासह अनेक देशांमध्ये कमीत कमी पैशांमध्ये लॉजिंगची सुविधा देणाऱ्या ओयो कंपनीचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. गुरुग्राममधील एका इमारतीच्या २० व्या मजल्यावरून पडल्यानं रमेश अग्रवाल यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं आता आयो कंपनीच्या संस्थापकांवर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे. तीन दिवसांपूर्वीच रितेश यांचा विवाहसोहळा पार पडला होता. परंतु आता अचानक त्यांच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळं शोक व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची गुरुग्राम पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News: पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर लागली गोळी, तरुणाचा मृत्यू

Heat Wave Alert : मे महिन्यातही सूर्य कोपणार! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट

Vande Bharat Metro : वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लुक आला समोर, लवकरच होणार लाँच; पाहा VIDEO

IRCON Recruitment 2024: भारतीय रेल्वेत असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; पगार १ लाख ४० हजार!

आयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनीच याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेयर करत म्हटलं आहे की, जड अंत:करणानं मी तुम्हाला कळवत आहे की, आमची ताकद आणि मार्गदर्शक असलेले माझे वडील रमेश अग्रवाल यांचं निधन झालेलं आहे. उत्साहानं आयुष्य जगत माझ्यासह अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली होती. त्यांच्या जाण्यामुळं माझ्या कुटुंबाचं मोठं नुकसान झालेलं असून त्यांचे शब्द आमच्या ह्रदयात खोलवर गुंजणार आहेत, असं रितेश अग्रवाल यांनी म्हटलं आहे. रमेश अग्रवाल हे इमारतीतून खाली पडले त्यावेळी घटनास्थळी रितेश यांच्यासह त्यांची आई आणि पत्नी उपस्थित होत्या, अशी माहिती गुरुग्राम पोलिसांनी दिली आहे. 

गुरुग्रामच्या सेक्टर ५४ मधील डीएलएफच्या 'द क्रेस्ट' इमारतीच्या २० व्या मजल्यावरून पडल्यानं रमेश अग्रवाल यांचं निधन झालं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची कलम १७४ अन्वये चौकशी सुरू केली आहे. एसएचओच्या पथकानं घटनास्थळाची चौकशी केल्यानंतर रमेश अग्रवाल यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर त्याचा मृतदेह अग्रवाल कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे.

गेल्या सात मार्चला रितेश यांचा गीतांशा सूद हिच्याशी विवाह झाला होता. लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांनंतरच रितेश यांच्या वडिलांचं निधन झाल्यामुळं शोक व्यक्त केला जात आहे. आयोचे संस्थापक असलेले रितेश अग्रवाल हे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक आहेत. भारतासह जगातील ३५ देशांमध्ये त्यांच्या आयो कंपनीचं जाळं पसरलेलं आहे. त्यामुळं आता त्यांच्या वडिलांच्या निधनामुळं अनेकांनी दुख: व्यक्त केलं आहे.