मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Police : प्रभादेवीत गोळीबार करणारा दुसराच; सदा सरवणकरांना पोलिसांकडून क्लिनचिट

Mumbai Police : प्रभादेवीत गोळीबार करणारा दुसराच; सदा सरवणकरांना पोलिसांकडून क्लिनचिट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 10, 2023 08:14 PM IST

sada saravankar : शिंदे आणि ठाकरे गटातील राड्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नव्हता, असा निष्कर्ष पोलिसांनी तपासातून काढला आहे.

sada saravankar clean chit by mumbai police
sada saravankar clean chit by mumbai police (HT)

sada saravankar clean chit by mumbai police : मुंबईच्या प्रभादेवीत गणेशोत्सवादरम्यान ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. परंतु आता या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याचा अहवाल जारी केला आहे. त्यात प्रभादेवीत गोळीबार करण्यात आला होता, परंतु सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नव्हता, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता प्रभादेवीतील राजकीय राज्यावेळी गोळीबार करणारा आरोपी नेमका कोण?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी केलेल्या बॅलेस्टिक चाचणीतून बंदूकीतून गोळीबार झाल्याचं स्पष्ट झालं असून दुसऱ्याच व्यक्तीनं गोळीबार केल्याचं स्पष्ट करत मुंबई पोलिसांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना क्लिनचिट दिली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुंबईतील प्रभादेवीत गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्यात एका व्यक्तीनं थेट गोळीबार केला होता. त्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनीच गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत त्याचा अहवाल जारी केला आहे. त्यात सदा सरवणकर यांना क्लीनचीट देण्यात आली आहे.

प्रभादेवीत गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी बॅलेस्टिक अहवाल न्याय सहायक विज्ञान प्रयोगशाळेतून केला होता. सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार झाला पण तो त्यांनी केला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या तपासाचा अहवाल महाराष्ट्राच्या विधीमंडळातही पाठवण्यात आला आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून पुन्हा ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point