मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिलेला नाही; तिथं प्रश्न नागांचा आहे; काय म्हणाले शरद पवार?

नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिलेला नाही; तिथं प्रश्न नागांचा आहे; काय म्हणाले शरद पवार?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 10, 2023 06:21 PM IST

Sharad Pawar on Nagaland Politics : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेबाबत शरद पवार यांनी सविस्तर खुलासा केला आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar on Nagaland Politics : ईशान्येतील नागालँड राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर तिथं सर्वपक्षीय सरकार सत्तेत आलं आहे. देशभरात भाजपविरोधी भूमिका घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही तिथल्या सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यावरून राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे.

नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. नागालँडमधील भूमिकेवरून होत असलेल्या आरोपांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं. 'आम्ही भाजपला पाठिंबा दिलेला नाही. नागालँडमध्ये कुठलाही पक्ष सरकारबाहेर राहिलेला नाही. सर्व पक्ष एकत्र आले आहेत. तिथं नागा जमातीचे काही प्रश्न आहेत. एकेकाळी नागा संघटना देशविघातक कारवाया करत होत्या. त्या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न तिथल्या मुख्यमंत्र्यांनी केला होता. ते मुख्यमंत्री भाजपचे नाहीत. त्यांनी सगळ्या पक्षांशी संपर्क केला होता, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

'आमच्या पक्षानं व आमदारांनीही भाजपसोबत जाण्यास विरोध दर्शवला होता. मात्र, ऐक्याच्या दृष्टीनं तिथल्या मुख्यमंत्र्यांकडून काही पावलं टाकली जात असतील तर आम्ही नकारात्मक भूमिका घेणार नाही. विध्वंसक भूमिका घेणार नाही, आमचं सहकार्य असेल, यापलीकडं यात दुसरं काहीही नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

IPL_Entry_Point

विभाग