मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Old Pention Scheme : इगो सोडू चर्चा करा, इमोशनल नको प्रॅक्टिकल व्हा; फडणवीसांचं कर्मचाऱ्यांना आवाहन

Old Pention Scheme : इगो सोडू चर्चा करा, इमोशनल नको प्रॅक्टिकल व्हा; फडणवीसांचं कर्मचाऱ्यांना आवाहन

Mar 10, 2023 08:17 PM IST

Devendra Fadnavis : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेणारी मंडळी आम्ही नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis On Old Pention Scheme
Devendra Fadnavis On Old Pention Scheme (Chandrakant Paddhane)

Devendra Fadnavis On Old Pention Scheme : राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी आंदोलनं करण्यास सुरुवात केली आहे. पुणे, कोल्हापुर आणि मुंबईत कर्मचारी संघटनांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी मोर्चे काढल्यानंतर आता विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी याच मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच कात्रीत पकडलं आहे. त्यानंतर आता अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेणारी मंडळी आम्ही नाहीयोत. कर्मचाऱ्यांनी ईगो सोडून चर्चेसाठी यावं, कारण हा विषय प्रॅक्टिकल असल्याचं सांगत राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता या मुद्द्यावरून कर्मचारी संघटना पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जुनी पेन्शन योजना आपण महाराष्ट्रात लागू केली तर त्याचा काहीही फरक पडणार नाही. परंतु २०३० नंतर त्याचे विपरीत परिणाम दिसायला लागतील. मी लाँग टर्मचा विचार करत आहे. कर्मचारी संघटनांनी इगो विषय न करता चर्चेला यावं. नुकतीच एका संघटनेने संपाची नोटीस दिली आहे. आम्ही या विषयावरील चर्चेला तयार आहोत. कर्मचाऱ्यांनी आणि विरोधी पक्षानं इगो सोडून चर्चेसाठी यावं, कारण हा विषय इमोशनल नाही तर प्रॅक्टिकल होण्याचा असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीसांनी कर्मचारी संघटनांना सुनावलं आहे.

देशातील ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, ते राज्य २०३० पर्यंत पैसे देतील. परंतु त्यानंतर त्यांना पैसे देणं शक्य होणार नाहीये. केंद्र सरकार फक्त योजनांसाठीच पैसे देत असतं, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी नाही. त्यामुळं आपण ही योजना लागू केली तर त्यामुळं आपला महसूल वाढणार नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या सगळ्या मुद्द्यांवर मी बोलण्यासाठी तयार आहे. कर्मचारी संघटनांनी भावनिक होऊ नये. त्यांनी तांत्रिक बाजू समजून घेण्याची गरज आहे. महाराष्ट्राचा प्रश्न असल्यानं विरोधी पक्षांनीही या विषयाचा इगो करू नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४