मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bijapur Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलीस छावणीवर हल्ला; ३ जवान शहीद, १४ जखमी

Bijapur Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलीस छावणीवर हल्ला; ३ जवान शहीद, १४ जखमी

Jan 30, 2024, 08:12 PM IST

  • Chhattisgarh Naxalite attack : छत्तीसगडमधील पोलीस छावणीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले आहेत, तर १४ जखमी झाले आहेत.

Chhattisgarh Naxal Attack

Chhattisgarh Naxalite attack : छत्तीसगडमधील पोलीस छावणीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले आहेत, तर १४ जखमी झाले आहेत.

  • Chhattisgarh Naxalite attack : छत्तीसगडमधील पोलीस छावणीवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले आहेत, तर १४ जखमी झाले आहेत.

Chhattisgarh Naxalite attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ जवान शहीद झाले आहेत, तर १४ जखमी झाले आहेत. जखमी जवानांपैकी काहींना उपचारासाठी जगदलपूरला तर काहींना रायपूर इथं एअरलिफ्ट करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू

Hindu Population : भारतात हिंदूच्या लोकसंख्येत गतीने घट तर मुस्लिम लोकसंख्या वृद्धी, वाचा अन्य अल्पसंख्यांकांची स्थिती

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

विजापूर (bijapur) आणि सुकमा (Sukma) जिल्ह्यांच्या सीमेवरील टेकुलगुडम (Tekalgudem) गावात पोलीस छावणी उभारण्यात आली आहे. स्थानिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याचा व त्यांच्या मदतीचा उद्देश यामागे आहे. 

नवरा शारीरिक सुख देत नाही, पत्नीची पोलिसात धाव; कल्याणमधील प्रकार

ही छावणी उभारण्याचं काम झाल्यानंतर कोब्रा, एसटीएफ व डीआरजी फोर्सचे जवान शोधमोहिमेवर निघाले होते. त्याचवेळी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी अचानक बेछूट गोळीबार केला. त्यात ३ जवानांना वीरमरण आलं. तर १४ जखमी झाले.

नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. सुरक्षा दलांपुढं निभाव लागणार नसल्याचं लक्षात येताच नक्षलवादी जंगलात पळून गेले.