मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Street Dogs : भुंकणाऱ्या कुत्र्यांवर तरुणाचा तुफान गोळीबार; एका कुत्र्याचा मृत्यू, आरोपीवर गुन्हा

Street Dogs : भुंकणाऱ्या कुत्र्यांवर तरुणाचा तुफान गोळीबार; एका कुत्र्याचा मृत्यू, आरोपीवर गुन्हा

Jan 27, 2023, 07:17 PM IST

    • Firing On Street Dogs : वाहन चालवत असताना कुत्रा भुंकला म्हणून तरुणानं थेट कुत्र्यांवरच गोळीबार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
Firing On Street Dogs In Kanpur Uttar Pradesh (HT)

Firing On Street Dogs : वाहन चालवत असताना कुत्रा भुंकला म्हणून तरुणानं थेट कुत्र्यांवरच गोळीबार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

    • Firing On Street Dogs : वाहन चालवत असताना कुत्रा भुंकला म्हणून तरुणानं थेट कुत्र्यांवरच गोळीबार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Firing On Street Dogs In Kanpur Uttar Pradesh : रस्त्यावरून वाहन चालवत असताना कुत्रा भुंकला म्हणून आरोपी तरुणानं दोन कुत्र्यांवर गोळीबार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तरुणानं केलेल्या गोळीबारात एका कुत्र्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दुसऱ्या कुत्र्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यासाठी त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Prajwal Revanna Case: कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना यांना SIT कडून अटक

Jammu Kashmir : हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

दोन मित्र सोबत पीत होते दारू.. पत्नीविषयी अश्लील बोलल्याने झाला वाद अन् घरी येऊन जीवन संपवले

Parcel bomb in Gujarat: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय; पार्सल बॉम्ब पाठवून केली दोघांची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपुर शहरातल्या काकादेव परिसरात कुत्रे भुंकल्यामुळं संतापलेल्या तरुणानं वाहनातील रायफल काढून दोन कुत्र्यांवर गोळीबार केला. त्यात एका कुत्र्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. कुत्र्यांवर गोळीबार झाल्याची घटना समजताच स्थानिकांसह प्राणीप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी कुत्र्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृत्यू झालेल्या कुत्र्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानंतर स्थानिकांसह प्राणीप्रेमींनी या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल करत आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कुत्र्यांवर गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. कुत्र्यांवर गोळीबार केल्यानंतर आरोपी तरुण फरार झालेला असल्यामुळं पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज चेक करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं पोलीस निरिक्षक विनय कुमार शर्मा यांनी सांगितलं आहे.