मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Border Dispute : अमित शहा यांच्या भेटीनंतर सीमावादावर सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान, म्हणाल्या…

Border Dispute : अमित शहा यांच्या भेटीनंतर सीमावादावर सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान, म्हणाल्या…

Dec 09, 2022, 06:13 PM IST

  • Maharashtra Karnataka border dispute : महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना सांगितले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात आता केंद्र हस्तक्षेप करेल व अमित शहा यातून काहीतरी मार्ग काढतील.

सुप्रिया सुळे

Maharashtra Karnataka border dispute : महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना सांगितले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात आता केंद्र हस्तक्षेप करेल व अमित शहा यातून काहीतरी मार्ग काढतील.

  • Maharashtra Karnataka border dispute : महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना सांगितले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात आता केंद्र हस्तक्षेप करेल व अमित शहा यातून काहीतरी मार्ग काढतील.

Supriya Sule on Border Dispute: महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. खासदारांच्या शिष्टमंडळाने या भेटीत गेल्या काही दिवसांपासून धूमसत असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वक्तव्ये व स्थानिक भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत होत असलेली आक्षेपार्ह वक्तव्ये यासह राज्यातील अन्य प्रश्नांबाबत अमित शहा यांना अवगत केले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विश्वास व्यक्त केला की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नक्कीच काहीतरी मार्ग काढतील.

ट्रेंडिंग न्यूज

Heat Wave Alert : मे महिन्यातही सूर्य कोपणार! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट

Vande Bharat Metro : वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लुक आला समोर, लवकरच होणार लाँच; पाहा VIDEO

IRCON Recruitment 2024: भारतीय रेल्वेत असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; पगार १ लाख ४० हजार!

Dhruv Rathee: दाऊद इब्राहिमच्या बंगल्यात राहतो ध्रुव राठी आणि त्याची पाकिस्तानी पत्नी? यूट्यूबरने केला खुलासा

अमिश शहा यांच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गृहमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना भेटीसाठी वेळ दिल्याने त्यांचे आभार मानते. आम्ही राज्यातील अनेक समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन त्यांनी यातून मार्ग काढण्याची विनंती केल्याचे सुळे यांनी सांगितले. अमित शहा यांनी शब्द दिला आहे की, गुजरात सरकारचा शपथविधी झाल्यानंतर सीमावादावर काहीतरी मार्ग काढला जाईल. त्यामुळे सीमावादात आता केंद्र सरकारचा हस्तक्षेप होईल, असा मला विश्वास असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आमची राज्यातील सर्व प्रश्नांवर चर्चा झाली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बेताल वक्तव्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबाबतची अवमानकारक वक्तव्ये, शिंदे सरकारमधील वाचाळवीरांची माहिती गृहमंत्र्यांना आम्ही दिली आहे. तसेच छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांची राज्य सरकारकडून कशी पाठराखण केली जात आहे, हे देखील गृहमंत्र्यांच्या निर्दशनास आणून देण्यात आले आहे.