मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 12 April 2023 : नितीश कुमार यांनी घेतली राहुल गांधींची भेट; राजकीय हालचालींना वेग
Live News

Live News Updates 12 April 2023 : नितीश कुमार यांनी घेतली राहुल गांधींची भेट; राजकीय हालचालींना वेग

Apr 12, 2023, 09:33 PMIST

Nitish kumar met Rahul Gandhi : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री यादव यांनी आज (दि.१२) दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. आमच्यात विरोधी ऐक्याबाबत चर्चा झाली

Apr 12, 2023, 09:33 PMIST

सिंधुदुर्गात ठाकरे-राणे समर्थकांत जोरदार राडा, भूमिपूजनाच्या कार्यक्रमात धक्काबुक्की

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून रविंद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, उद्धव ठाकरे यांचे १९ बंगले प्रकरण यामुळे कोकणातील राजकारण तापलं असताना आता उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक व राणे समर्थक एकमेकांना भिडले आहेत. कुडाळ तालुक्यातील पावशी येथे भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार वैभव नाईक यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Apr 12, 2023, 09:04 PMIST

ICC T20 Ranking : आयपीएलमध्ये फ्लॉप पण आयसीसीच्या क्रमवारीत अग्रस्थानी, फॉर्म नसतानाही सूर्याचा जलवा

Suryakumar Yadav ICC Ranking : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेपासून भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवाच फॉर्म गायब झालेला आहे. परंतु आता आयसीसीनं जारी केलेल्या टी-ट्वेंटी रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादवने पहिलं स्थान कायम राखलं आहे.

Apr 12, 2023, 09:02 PMIST

IPL Betting Case : आयपीएलवर वर्ध्यात सट्टेबाजी, पोलिसांकडून दोघांना अटक

IPL Betting Case : आयपीएलचा थरार सुरू असतानाच वर्ध्यात पोलिसांनी आयपीएलच्या सामन्यांवर सट्टेबाजीच्या आरोपाखाली दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून ५० लाखांची रोकड, लॅपटॉप आणि तब्बल ४० स्मार्टफोन्स जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Apr 12, 2023, 08:04 PMIST

मुंबईः कुर्ल्यात पोलिसांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन

मुंबईत कुर्ला आणि विनोबा भावे नगर पोलिसांनी संयुक्तरीत्या कुर्ला पश्चिम येथील कच्छीविसा सभागृहात सामाजिक सलोखा जपण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यात डीसीपी मनोज पाटील, एसीपी गोविंद गंभीरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली, माजी नगरसेवक कप्तान मलिक, मनोज नाथानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुर्ला रवींद्र होवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोबा भावे नगर राजीव चव्हाण उपस्थित होते.

मुंबईः कुर्ल्यात पोलिसांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन
मुंबईः कुर्ल्यात पोलिसांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन

Apr 12, 2023, 07:26 PMIST

Tata Motors Nexon :  नेक्साॅनच्या ५ लाखावी गाडी उत्पादन प्रकल्पाबाहेर

टाटा मोटर्सने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन टाटा नेक्साॅनच्या ५ लाखावी गाडी  पुण्याच्या रांजणगाव उत्पादन प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचा आनंद सर्वांसोबत शेअर केला. टाटा नेक्साॅनला कंपनीने २०१७ मध्ये पहिल्यांदा दाखल केले होते. त्यावेळी गाडीची किंमत ५.८५ लाख रुपये होती. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत नेक्साॅनला कंपनीने विविध व्हेरियंट्समध्ये दाखल केले आहे.

Apr 12, 2023, 07:15 PMIST

येत्या ३-४ तासात पुणे, नाशिक आणि धुळ्यात पावसाची शक्यता

येत्या ३-४ तासांत नाशिक, पुणे, धुळे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह  व गडगडाटी वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन मुंबई हवामान विभागाने केले आहे.

Apr 12, 2023, 07:01 PMIST

कॉंग्रेस नेते राहुल गांधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटले

नवी दिल्लीः कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची नवी दिल्लीत भेट घेतली. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.  एकत्र येऊन जनतेचा आवाज बुलंद करणे तसेच देशाला एक नवी दिशा देण्याबाबत उभयंतांमध्ये चर्चा झाल्याचे कॉंग्रेसकडून सांगण्यात आले.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यादरम्यान भेट
कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यादरम्यान भेट

Apr 12, 2023, 06:13 PMIST

Audi Price hike :  येत्या १ मे पासून आॅडी महागणार

लक्झरी कार बनवणारी जर्मनीची कंपनी ऑडीने क्यू३ आणि क्यू३ स्पोर्टबॅकच्या किंमतीमध्ये १.६% वाढ करीत असल्याची घोषणा केली. ही वाढ १ मे २०२३ पासून लागू होईल. कंपनीने ऑडी क्यू८ सेलिब्रेशन, आरएस५ आणि एस५ च्या किंमतीत अलीकडेच २.४ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लों यांनी सांगितलं की, "ऑडी इंडियामध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो परंतु सीमाशुल्क आणि उत्पादन खर्चातील वाढीचा परिणाम भरून काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. कंपनीने विविध पातळ्यांवर किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी, सध्याच्या परिस्थितीमुळे किमतीत वाढ होणे आवश्यक आहे."

Apr 12, 2023, 05:56 PMIST

राज्यात अनेक भागात पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, गारपिटीचाही अंदाज

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर १२ ते १४ एप्रिल या कालावधीत मध्य महाराष्ट्रात गारपिटीची अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. १३ एप्रिल रोजी कोकणात आणि १४ एप्रिल रोजी मराठवाड्यात गारपीट होणार असल्याचा अंदाज आहे. 

Apr 12, 2023, 04:56 PMIST

Maha Vikas Aghadi : मविआत कसलेही मतभेद नाहीत; मतभेद असल्याचा विरोधकांकडून अपप्रचार - नाना पटोले

महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमूठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होत आहे त्यानंतर मुंबई व इतर ठिकाणी या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत व त्यांच्याकडून अपप्रचार केला जात आहे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची काहीच गरज नाही, असंही ते म्हणाले.

Apr 12, 2023, 04:51 PMIST

Baskin Robbins :  बास्किन रॉबिन्सची पुण्यात विस्तारीकरणाची योजना 

आईसक्रीमच्या दुकानांच्या जगातील सर्वात मोठ्या शृंखलांपैकी एक, बास्किन रॉबिन्सची आईसक्रीम्सने पुण्यात विस्तारीकरणाची योजना जाहीर केली आहे. आपल्या ग्राहकांच्या मागण्या आणि आवडीनिवडी ध्यानात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी बास्किन रॉबिन्सने आपल्या उत्पादनांमध्ये नवीन फॉरमॅट्स आणि स्वादांची भर टाकली आहे. यंदाचा उन्हाळा आपल्या ग्राहकांसाठी सुसह्य व्हावा यासाठी अनेक नवीन उत्पादन विभाग व नवे स्वाद सुरु केल्याची घोषणा या ब्रँडने नुकतीच केली होती. पुणे शहरभरात अनेक मोक्याच्या ठिकाणी बास्किन रॉबिन्सची २५ पार्लर्स आधीपासून आहेत. उर्वरित महाराष्ट्रात त्यांची अजून १७ पार्लर्स आहेत. पुणे शहर आणि आजूबाजूच्या भागांमध्ये अजून ८ ते १० पार्लर्स सुरु करून जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्या आईसक्रीम्सचा आनंद घेता यावा अशी ब्रँडची योजना आहे. बास्किन रॉबिन्स आपल्या नेटवर्कमध्ये सातत्याने वाढ करत असून, उत्पादने व मार्केटिंग उपक्रमांची विचारपूर्वक निवड करून युवा ग्राहकांमध्ये ब्रँडविषयीची आवड अधिकाधिक वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. 

Apr 12, 2023, 04:10 PMIST

Closing bell : सलग आठव्या सत्रात तेजी कायम, टीसीएसमध्ये तेजी

सेन्सेक्स-निफ्टी सलग ८व्या दिवशी वाढीसह बंद झाले. टीसीएसच्या निकालापूर्वी आयटी समभागांमध्ये खरेदी दिसून आली, तर धातू, बँकिंग निर्देशांक वधारल्याने बंद झाले. एफएमसीजी, एनर्जी, पीएसई समभागांमध्ये मात्र दबाव होता. बुधवारी व्यवहार संपल्यावर सेन्सेक्स २३५.०५ अंकांनी म्हणजेच ०.३९ टक्क्यांच्या वाढीसह ६०,३९२.७७ वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी ९०.१० अंकांच्या किंवा ०.५१टक्क्यांच्या वाढीसह १७,८१२.४० च्या पातळीवर बंद झाला. बुधवारच्या व्यवहारात डिव्हिस लॅब्स, बजाज ऑटो, अदानी एंटरप्रायझेस, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज आणि आयशर मोटर्स या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर ग्रिड कॉर्प, एनटीपीसी, नेस्ले इंडिया, ओएनजीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट सर्वाधिक घसरले.

Apr 12, 2023, 04:04 PMIST

Mirai Assets : मिरे असेस्टची १५ वर्षे पूर्ण, एसआयपी गुंतवणूकीचा मोठा टप्पा पार

मिरे अॅसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (एएमसी) आणि कंपनीच्या प्रमुख फंडापैकी एक असलेल्या मिरे अॅसेट लार्ज कॅप फंड (लार्ज कॅप फंडः लार्ज कॅप समभागांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणारी मुदतमुक्त समभाग योजना) यांनी आपल्या कारकिर्दीचा 15 वर्षाचा महत्वाचा टप्पा यशस्वीरित्या पुर्ण केला आहे.

Apr 12, 2023, 03:47 PMIST

Anna Hazare : अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची नगरमधील शेतकऱ्याची धमकी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची १ मे रोजी हत्या करण्याची जाहीर धमकी अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं दिली आहे. माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप या शेतकऱ्यानं केला आहे. मला न्याय न मिळाल्यास जे काही होईल त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असंही त्यानं म्हटलं आहे. त्याच्या या धमकीमुळं राज्यात खळबळ उडाली आहे.

Apr 12, 2023, 03:02 PMIST

future retail : फ्यूचर रिटेलच्या खरेदीसाठी ४९ कंपन्या मैदानात

फ्यूचर समूहाची कंपनी फ्यूचर रिटेलच्या शेअर्समध्ये सलग तीन ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट लागत आहे.आजही हे अप्पर सर्किट कायम राहिले आहे. फ्यूचर रिटेल कंपनीचे शेअर्स आज सुरुवातीच्या सत्रात ५ टक्क्यांपर्यंत तेजीसह २.८३ रुपयांवर ट्रेड करत होते.कंपनीच्या शेअर्समधील तेजीमागे एक प्रमुख कारण आहे. वास्तविक दिवाळखोरी प्रक्रियेतून जात असलेल्या फ्यूचर रिटेलला खरेदी करण्याच्या स्पर्धेत अदानी अंबानींसहित ४९ दिग्गज कंपन्या सहभागी आहेत.

Apr 12, 2023, 02:12 PMIST

Pune University : बलशाली भारतासाठी एकात्म मानवतावादाचा जागर व्हावा; कुलगुरू डॉ.कारभारी काळे: साहित्यिकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा

लेखन करणे ही सोपी गोष्ट नाही. आजुबाजूच्या जगातले दुःख हेरून आणि माणसा माणसातील दुही नष्ट होण्याचा प्रयत्न साहित्यिकांनी करायला हवा, अनेक साहित्यिक हे करत आहेत. त्यांनी आपल्या लेखनातून एकात्म मानवतावादाचा जागर केला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर बलशाली भारत निर्माण होईल, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी व्यक्त केले.

Apr 12, 2023, 01:45 PMIST

नवी मुंबईः मनसेचे सिडको विरोधात ‘भीक मागा’ आंदोलन 

नवी मुंबईत मनसेचे सिडको विरोधात ‘भीक मागा’ आंदोलन. सिडको घरांच्या किमती कमी करण्याची मागणी. शेकडो सोडतधारकांचा आंदोलनात सहभाग. सिडको सोडतधारक लवकरच घेणार राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट. उलवे आणि बामन डोंगरी येथील सिडको घरांच्या अवाजवी किमतींविरोधात मनसेतर्फे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली झाले ‘भीक मागा’ हे आंदोलन.

नवी मुंबईः मनसेचे सिडको विरोधात ‘भीक मागा’ आंदोलन
नवी मुंबईः मनसेचे सिडको विरोधात ‘भीक मागा’ आंदोलन

Apr 12, 2023, 01:34 PMIST

Darshan Solanki Suicide : मुंबई आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या आत्महत्या प्रकरणी भाजपची पत्रकार परिषद

आयआयटी बॉम्बे येथील विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगानं भूमिका मांडण्यासाठी भाजपचे माजी खासदार अमर साबळे व आमदार राम यांनी आज दुपारी ३.३० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे.

Apr 12, 2023, 01:08 PMIST

Canara bank :  कॅनरा बँकेच्या कर्जदरात वाढ, ईएमआयचा बोजा वाढणार

खासगी क्षेत्रातील कॅनरा बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) वाढवला आहे. यामुळे, ६ महिन्यांच्या आणि एका वर्षाच्या कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये वाढ झाली आहे, अशा परिस्थितीत एमसीएलआरशी जोडलेल्या कर्जावरील व्याजदरात वाढ होईल. परिणामी कर्जदारांना जास्त ईएमआय भरावा लागेल. ही दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे.

Apr 12, 2023, 12:25 PMIST

Western Line: पश्चिम रेल्वेवर ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेटला जाणाऱ्या लोकल उशिराने

तांत्रिक बिघाडामुळे बोरीवली ते चर्चगेट मार्गावरील लोकल वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले.सकाळी दहा वाजताच्या सुमारास अप फास्ट मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेट दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत.

Apr 12, 2023, 12:02 PMIST

Pune News : तीन दिवसांत साडेसहा हजार आधार कार्ड अद्ययावत

जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या खास शिबिरांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील तब्बल साडेसहा हजार नागरिकांनी केवळ तीन दिवसांत आधार कार्ड अद्ययावत करून घेतले आहे. अद्यापही २५ लाख ९५ हजार नागरिकांचे आधार अद्ययावत करणे बाकी असून या नागरिकांसाठी १४ ते १६ एप्रिल या सुट्यांच्या दिवशी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडून खास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Apr 12, 2023, 11:55 AMIST

Online gaming :  आॅनलाईन गेमिगविरोधात तामिळनाडू सरकारचे विधेयक 

ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर आता कारवाई कडक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंगशी संबंधित नियम कडक करताना देखरेख, परवानगी देण्यासाठी स्वयं-नियामक संस्थांची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे.  केंद्र सरकारच्या या नियमाला अनुसरुन आता तामिळनाडू सरकारने ऑनलाइन गेमिंगद्वारे बेटिंगवर पूर्णपणे बंदी घातली आहे. यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

Apr 12, 2023, 11:53 AMIST

Drone Startup :  कृषी ड्रोनसाठी गरुड एरोस्पेसचा पुढाकार 

भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी-समर्थित ड्रोन स्टार्टअप गरुड एरोस्पेस त्याच्या कृषी ड्रोनसाठी कृषी अनुदान मिळवणारे पहिले स्टार्टअप बनले आहे. ही सबसिडी अॅग्री ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकाराचा एक भाग आहे.

Apr 12, 2023, 11:10 AMIST

Snambhaji Nagar Accident: छत्रपती संभाजीनगरात दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगरात वेगाने येणाऱ्या दोन दुचाक्यांमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बिडकीन इसारवाडी येथील शेकटा फाटा येथे हा अपघात घडला आहे. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Apr 12, 2023, 10:51 AMIST

Coronavirus: भारतात गेल्या २४ तासात ७ हजार ८३० नव्या रुग्णांची नोंद

भारतातील सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची संख्याने ४० हजारांचा आकडा .ओलांडला आहे देशात गेल्या २४ तासात ७ हजार ८३० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Apr 12, 2023, 10:32 AMIST

Bathinda Military Station: भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये गोळीबार, चार जवानांचा मृत्यू

Punjab News: पंजाबच्या भठिंडा मिलिट्री कॅम्प परिसरात गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. गोळीबारानंतर कन्टॉन्मेट परिसराला सील करण्यात आले आहे. छावणी परिसरात झालेल्या घटनेनंतर परिसरात प्रवेश करण्यास मनाई आहे.

Apr 12, 2023, 09:57 AMIST

Ajit Pawar : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा; ईडीने आरोपपत्रात अजित पवार, सुनेत्रा पवारांना वगळले

Maharashtra Co operative Bank Scam: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, यात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नावे वागळल्यात आली आहेत.

Apr 12, 2023, 09:51 AMIST

Bihar Earthquake: बिहारच्या अररियामध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप

बिहारच्या अररियामध्ये बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.३ एवढी नोंदवण्यात आली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Apr 12, 2023, 09:34 AMIST

Pune : युवा कबड्डी सिरीज मध्ये आकाश शिंदेची वादळी खेळी

नाशिक द्वारका डिफेंडर्स विरुद्ध धुळे चोला वीरांस यांच्यात आजची तिसरी लढत झाली. नाशिक संघ सातव्या तर धुळे संघ आठव्या स्थानावर होता. नाशिक संघाकडून सुरुवातीला जोरदार खेळ केला. नंतर मात्र धुळे संघाने चांगला प्रतिकार केला. दोन्ही संघांनी एकमेकांना एक वेळ मध्यंतराच्या आधी ऑल आऊट केले. नाशिक संघाकडून आकाश शिंदे नावाचा वादळ काही थांबायचं नाव घेत नव्हतं. मध्यंतरा पर्यत आकाश ने चढाईत २२  गुण मिळवले होते. त्यानंतर ही आक्रमक पवित्रा घेत सलग तीन सामन्यात ३० पेक्षा जास्त गुण मिळवण्याचा रेकॉर्ड आकाश शिंदे ने केला. ३  सामन्यात १०० गुण मिळवत आकाश शिंदे ने आणखी एक विक्रम आपला नावे केला. तर एका सामन्यात सर्वाधिक ४९  गुण मिळवण्याचा रेकॉर्ड आकाश शिंदे केला.

वा कबड्डी सिरीज मध्ये आकाश शिंदेची वादळी खेळी
वा कबड्डी सिरीज मध्ये आकाश शिंदेची वादळी खेळी

Apr 12, 2023, 09:22 AMIST

Opening bell : सलग तिसऱ्या सत्रात वाढ, टीसीएस, एचडीएफसी फोकसमध्ये

आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात चांगली झाली आहे. सेन्सेक्समध्ये २८.२९ अंशांची वाढ होत तो अंदाजे ६०,१८६ अंश पातळीवर खुला झाला. तर निफ्टीत ४ अंशांची वाढ होत तो १७,७२३.३० अंश पातळीवर खुला झाला. आज टीसीएस, एचडीएफसी बँक, नेस्ले, डेल्हीवेरी हे स्टाॅक फोकसमध्ये राहतील.

Apr 12, 2023, 08:59 AMIST

Pune : डॉ बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समिती चे वतीने पहिला समर्पण पुरस्कार सयाजी शिंदे यांना जाहीर

डॉ बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार समिती चे वतीने पहिला समर्पण पुरस्कार - सामजिक बांधिलकी असलेले प्रसिध्द अभिनेते,सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांना जाहीर. याची अधिकमाहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Apr 12, 2023, 08:40 AMIST

Soni Murder Case : भंडाऱ्याच्या सोनी हत्याकांडातील आरोपींना नऊ वर्षानंतर जन्मठेप

Bhandaaraa Soni Murder Case: भंडाऱ्याच्या तुमसर येथे २०१४ मध्ये सोनी हत्याकांड झाले होते. या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. या हत्याकांडाचा निकाल आज लागला असून सात आरोपींना न्यायालयानं जन्मठेप सुनावली आहे.

Apr 12, 2023, 07:12 AMIST

Pune : जिल्ह्यात वर्षभरात रेशीम कोषाचे २ लाख किलोपेक्षा अधिक वार्षिक उत्पादन

जिल्ह्यात सन २०२२-२३ या वर्षात तुती लागवडीसाठी देण्यात आलेल्या २५० एकर लक्षांकापैकी २४१ एकर क्षेत्रावर २२६ शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली असून चालू वर्षात ३ लाख ९ हजार ४०० अंडीपुंजाच्या कीटक संगोपनापासून २ लाख १८ हजार ४१४ किलोग्राम कोषांचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अंडीपुंज संख्या ३३ हजार ८२५ संख्येने जास्त असून कोष उत्पादन ४० हजार ५९९ किलोग्रामने वाढले असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी दिली आहे.

Apr 12, 2023, 06:11 AMIST

Lahor : लाहोर उच्च न्यायालयात इमरान खानच्या याचिकेवर सुनावणी

तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात लाहोर उच्च न्यायालयात इमरान खानच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Apr 12, 2023, 06:10 AMIST

PM Naredra Modi : दिल्ली कॅट वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अजमेर दिल्ली कॅट वंदे भारत एक्सप्रेसला सकाळी ११ वाजता हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 

Apr 12, 2023, 06:09 AMIST

आयसीसीआयसी बँक लोन घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी

आयसीसीआयसी बँक लोन घोटाळ्यातील आरोपी आणि व्हिडिओकॉनचे सर्वोसर्वा वेणुगोपाल धूत यांनी जामीनातील अटीशर्तींतून दिलासा मागत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनवणी.

Apr 12, 2023, 06:08 AMIST

Vande Bhaart express : प्रवाशांच्या भेटीला येणार आता नवी वंदे भारत एक्सप्रेस 

वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रचंड यशानंतर आता आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस भारतीय प्रवाशांना मिळणार आहे. सध्या धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस या चेअर कार म्हणजेच बसून प्रवास करणाऱ्या डब्यांच्या होत्या. मात्र भारतीय रेल्वे दिलेल्या नवीन एका ऑर्डर नुसार झोपून प्रवास करता येतील अशा स्लीपर क्लास वंदे भारत एक्सप्रेस बनवण्यात येणार आहेत.  

Apr 12, 2023, 06:06 AMIST

Karnataka election : कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाणार  

 कर्नाटकच्या निवडणुका लागल्यात. त्यामुळे महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहे. भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल ५४ बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. 

Apr 12, 2023, 06:04 AMIST

Chandrapur :  बहुजन समता पर्वात आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सहभागी होणार आहेत.

 Chandrapur : येथे चार दिवसीय आयोजित  बहुजन समता पर्वात आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सहभागी होणार आहेत.

Apr 12, 2023, 06:03 AMIST


Ambadas Danve : विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दाणवे निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.  

विधान परिषद विरोधी पक्षनेते आबांदास दानवे आज निफाड तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. चांदोरी, टाकळी, विंचूर भागात कांदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.

Apr 12, 2023, 06:01 AMIST

Pune : पुण्यात आज सावरकर गौरव यात्रा 

 पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. परवा देखील एफसी मार्गावरून ही यात्रा काढण्यात आली होती. 

Apr 12, 2023, 06:00 AMIST

Inflation rate  : किरकोळ महागाई दराचे आकडे आज केंद्र सरकार करणार घोषित 

  किरकोळ महागाई दराचे आकडे आज केंद्र सरकारकडून जारी केले जाणार आहेत. मागील दोन महिने बघता महागाई दर आरबीआयच्या टॉलरन्स बॅंडच्या वर बघायला मिळाला आहे. आरबीआयकडून पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे मार्च महिन्यातील महागाईचे आकडे वर गेल्यास पुन्हा एकदा व्याजदरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.  

Apr 12, 2023, 05:58 AMIST

नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Nawab Malik : नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिकांनी दाखल केलेला जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर हायकोर्टात विशेष सुनावणी सुरू आहे. नियमित कामकाज संपल्यावर दुपारी ४.३० वाजता सुनावणी सुरु होणार आहे.

    शेअर करा