मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran Khan : इमरान खान अडचणीत ! कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; पाकिस्तानी पोलिस, न्यायाधीशांना धमकी देणे भोवणार

Imran Khan : इमरान खान अडचणीत ! कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; पाकिस्तानी पोलिस, न्यायाधीशांना धमकी देणे भोवणार

Aug 21, 2022, 10:40 PM IST

    • Pakisthan Imran Khan News : इमरान खान यांच्या भाषणाच्या प्रक्षेपणावर बंदी घातली असताना आता त्यांच्यावर आणखी एक संकट येण्याची शक्यता आहे. एका भाषणा दरम्यान त्यांनी पोलिस आणि न्यायाधीशांना धमकी दिल्याने त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.
इमरान खान

Pakisthan Imran Khan News : इमरान खान यांच्या भाषणाच्या प्रक्षेपणावर बंदी घातली असताना आता त्यांच्यावर आणखी एक संकट येण्याची शक्यता आहे. एका भाषणा दरम्यान त्यांनी पोलिस आणि न्यायाधीशांना धमकी दिल्याने त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

    • Pakisthan Imran Khan News : इमरान खान यांच्या भाषणाच्या प्रक्षेपणावर बंदी घातली असताना आता त्यांच्यावर आणखी एक संकट येण्याची शक्यता आहे. एका भाषणा दरम्यान त्यांनी पोलिस आणि न्यायाधीशांना धमकी दिल्याने त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

 Imran Khan इमरान खान यांच्या भाषणाच्या प्रक्षेपणावर बंदी घातली असतांना आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. इमरान खान यांनी शनिवारी केलेल्या एका भाषणा दरम्यान, थेट पाकिस्तान पोलीस आणि न्यायाधीशांना धमकी दिली. त्यांचे हे वक्तव्य त्यांना भोवणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

Hyderabad Rain : तप्त उन्हाळ्यात अचानक बरसला मुसळधार पाऊस, भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

Porn Star Stormy Daniels : पायजम्यावर होते ट्रम्प; कंडोमही नव्हते घातले; प्रसिद्ध पॉर्न स्टारने केले गंभीर खुलासे

इमरान खान यांनी शनिवारी जाहीर सभा घेतली होती. या सभेत त्यांनी सत्ताधारी, पोलिस यंत्रणा आणि न्यायाधीशांवर टीकेची झोड उठवली होती. इस्लामाबादमधील येथे एफनाईन पार्क येथे ही सभा झाली होती. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून माझ्या पक्षाच्या नेत्यांचे अटक सत्र सुरू केले आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच शाहबाज गिल यांना अटक करण्यात आली आहे. यावर पोलिस म्हणतात आम्ही केवळ आदेशांचे पालन करतो. इमरान खान एवढ्यावरच थांबले नाही तर, त्यांनी महिला न्यायाधीशालाही धमकी दिली. त्यांच्यावर त्यांनी पक्षपात केल्याचा आरोप केला.

त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी (PEMRA) यांनी त्यांच्या या व्यक्तव्याचा निषेध करत इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली. दरम्यान पोलिस आणि प्रशासन अॅक्टिव मोडवर आले आहेत. त्यांनी इमरान खान यांना अटक करण्यासाठी रेंजर्सना अलर्टवर ठेवले आहे. खान यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांनी घटनेच्या कलम १९ चे उल्लंघन केले आहे. इम्रान खान देशाच्या लष्कर, पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांची भाषणे द्वेष पसरवणारी आहेत.

विभाग