मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amul Dairy Election : गुजरातमधील काँग्रेसचा अभेद्य बुरुज ढासळला; अमूल दूध संघात भाजपची एकहाती सत्ता

Amul Dairy Election : गुजरातमधील काँग्रेसचा अभेद्य बुरुज ढासळला; अमूल दूध संघात भाजपची एकहाती सत्ता

Feb 18, 2023, 06:33 PM IST

    • BJP vs Congrees In Amul Dairy Election : स्वातंत्र्यानंतर १९४८ साली अमूल दूध संघाची स्थापना झाली होती. तेव्हापासून अमूलवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती.
BJP vs Congrees In Amul Dairy Election (HT)

BJP vs Congrees In Amul Dairy Election : स्वातंत्र्यानंतर १९४८ साली अमूल दूध संघाची स्थापना झाली होती. तेव्हापासून अमूलवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती.

    • BJP vs Congrees In Amul Dairy Election : स्वातंत्र्यानंतर १९४८ साली अमूल दूध संघाची स्थापना झाली होती. तेव्हापासून अमूलवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती.

BJP vs Congrees In Amul Dairy Election : गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असतानाही भाजपनं डिसेंबरमध्ये तब्बल १५६ जागा जिंकत पुन्हा विधानसभेचं मैदान मारलं आहे. विधानसभेनंतर अमूल दूध संघाच्या निवडणुकीत गेल्या ७५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपनं सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळं आता गुजरातमध्ये हा काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपनं अमूल दूध संघाच्या निवडणुकीसाठी व्यूहरचना आखायला सुरुवात केली होती. भाजपच्या विजयानंतर काँग्रेसच्या सत्तेची सद्दी अखेर संपली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Archana express accident : धक्कादायक! धावत्या ट्रेनपासून वेगळे झाले इंजिन, ३ किमी अंतरावर जाऊन थांबले; मोठा अपघात टळला

ऑस्ट्रेलियात नाईट आऊटदरम्यान महिला खासदाराला ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल, पोस्ट करत मांडली व्यथा

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

गुजरातमध्ये अमूल डेयरी वगळता इतर १८ दूध सहकारी दूध संघावर भाजपची सत्ता आहे. अमूल दूध सहकारी संस्थेवर स्थापनेपासूनच काँग्रेसची एकहाती सत्ता राहिलेली होती. काँग्रेसचे नेते कांती परमार सोढा यांच्यासह पाच नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपनं सत्तेचा सोपान गाठला आहे. अमूल डेयरीचे चेयरमन राहिलेल्या रामसिंह परमार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही अमूल दूध संघावर भाजपची सत्ता आली नव्हती. परंतु त्यानंतर अमूलच्या पाच संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे संचालकांची संख्या वाढली होती. त्यानंतर झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे.

काँग्रेसच्या जोवनसिंह चौहान, मानसिंह झाला, सीता परमार, शारदा पटेल आणि घेला झाला या नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश केला होता. त्यानंतर अमूलच्या संचालक मंडळातील काँग्रेसच्या सदस्यांची संख्या कमी झाली आणि भाजपचं संख्याबळ वाढल्यामुळं अमूल दूध संघावर भाजपनं सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळं आता विधानसभेच्या निवडणकीनंतर काँग्रेससाठी गुजरातमधील हा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.