मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kargil Vijay Divas: शहिदांना मानवंदना देऊन पुण्यात राष्ट्रीय वॉर मेमोरियल येथे कारगिल विजय दिवस साजरा

Kargil Vijay Divas: शहिदांना मानवंदना देऊन पुण्यात राष्ट्रीय वॉर मेमोरियल येथे कारगिल विजय दिवस साजरा

Jul 26, 2022, 03:58 PM IST

    • पुण्यातील राष्ट्रीय वॉर मेमोरियल येथे २३ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यातील नॅशनल वॉर मेमोरियल येथे चीफ ऑफ स्टाफ, हेडक्वार्टर्स सदर्न कमांड लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांच्या हस्ते दक्षिण कमांडच्या सर्व श्रेणींच्या वतीने पुष्पहार अर्पण करत मानवंदना वाहण्यात आली.

पुण्यातील राष्ट्रीय वॉर मेमोरियल येथे २३ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

    • पुण्यातील राष्ट्रीय वॉर मेमोरियल येथे २३ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Kargil war vijay diwas पाकिस्तानने भारतीयांचा विश्वासघात करत कारगिल परिसरात घुसखोरांच्या रूपात आपले सैन्य घुसवले होते. ऑपरेशन अल बद्र अंतर्गत सियाचीन भारतापासून तोडण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान होता. या विरोधात ऑपरेशन विजय अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानला धुळ चा रत कारगिलवर पुन्हा विजय मिळवला. या विजयोस्तवाला आज २३ वर्ष पूर्ण झाले. या निमित्त पुण्यात लष्कराच्या (Indian Army( दक्षिण मुख्यालयातर्फे या युद्धात शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. पुण्यातही विविध ठिकाणी कारगिल विजय दिवासनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ट्रेंडिंग न्यूज

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जायेत खिल्ली, VIDEO

Viral News: पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर लागली गोळी, तरुणाचा मृत्यू

Heat Wave Alert : मे महिन्यातही सूर्य कोपणार! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट

<p>पुण्यात कारगिल विजय दिवस साजरा&nbsp;</p>

पुण्यातील नॅशनल वॉर मेमोरियल येथे चीफ ऑफ स्टाफ, हेडक्वार्टर्स सदर्न कमांड लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांच्या हस्ते दक्षिण कमांडच्या सर्व श्रेणींच्या वतीने पुष्पहार अर्पण करत मानवंदना वाहण्यात आली. ऑपरेशन विजयच्या यशानंतर दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस देशभरात साजरा केला जातो. या दिवशी भारताने कडक्याच्या थंडीत जगातील सर्वात उंचीवरच्या युद्धात पाकिस्तानी घुसखोरांनी विश्वासघातकीपणे ताब्यात घेतलेल्या उच्च चौक्यांवर यशस्वीपणे पुन्हा ताब्यात घेतल्या. कारगिल युद्ध हे ६० दिवसांपेक्षा जास्त काळ लढले गेले. २६ जुलै १९९९ रोजी भारताच्या पराक्रमी विजयाने हे युद्ध संपले.

 

हा दिवस आपल्याला आपल्या सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो ज्यांनी जम्मू आणि काश्मीर राज्याच्या बर्फाळ उंचीवर पाकिस्तानशी कारगिलची लढाई लढली आणि ती जिंकली. या वर्षी त्या भव्य विजयाचा 23 वा वर्धापन दिन आहे. भारतीय सशस्त्र दलाच्या सर्वोच्च बलिदान आणि गौरवशाली विजयाच्या स्मरणार्थ देशभर कार्यक्रम आयोजित केले जातात. पुण्यात अनेक ठिकाणी या विजयोस्तवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात अनेक सामाजिक संस्थानी विधायक कार्यक्रम आयोजित करत शहिदांना आदरांजली वाहिली.

विभाग