मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kargil Diwas: कारगिल युद्धात भारताविरुद्ध लढायला निघाला होता शोएब अख्तर, पण…

Kargil Diwas: कारगिल युद्धात भारताविरुद्ध लढायला निघाला होता शोएब अख्तर, पण…

Jul 26, 2022, 01:38 PM IST

    • Kargil Vijay Diwas: आज देशभरात कारगिल विजय दिवस  साजरा केला जात आहे. २३ वर्षांपूर्वी ६० दिवसांपेक्षा जास्त काळ चाललेल्या कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) यावर एक वक्तव्य केले होते. ‘भारताविरुद्धच्या युद्धात आपण दोनदा लढायला गेलो होतो’, असे शोएबने म्हटले होते.
Shoaib Akhtar on kargil war

Kargil Vijay Diwas: आज देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. २३ वर्षांपूर्वी ६० दिवसांपेक्षा जास्त काळ चाललेल्या कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) यावर एक वक्तव्य केले होते. ‘भारताविरुद्धच्या युद्धात आपण दोनदा लढायला गेलो होतो’, असे शोएबने म्हटले होते.

    • Kargil Vijay Diwas: आज देशभरात कारगिल विजय दिवस  साजरा केला जात आहे. २३ वर्षांपूर्वी ६० दिवसांपेक्षा जास्त काळ चाललेल्या कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) यावर एक वक्तव्य केले होते. ‘भारताविरुद्धच्या युद्धात आपण दोनदा लढायला गेलो होतो’, असे शोएबने म्हटले होते.

Shoaib Akhtar on Kargil Vijay Diwas: भारत आज (२६ जुलै) कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. २३ वर्षांपूर्वी कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. कारगिल युद्ध ६० दिवसांपेक्षा जास्त चालले. या युद्धाला ऑपरेशन विजय असे नाव देण्यात आले होते. पाकिस्तानशी लढताना या युद्धात ५२७ भारतीय जवान शहीद झाले होते.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानया दोन्ही बाजूंच्या अनेक खेळाडूंनी अनेकदा या युद्धावर जोरदार भाषणबाजी केली आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचाही समावेश आहे. शोएबने २ वर्षांपूर्वी एका पाकिस्तानी न्यूज चॅनलवर म्हटले होते की, ‘मी दोनदा कारगिलमध्ये भारताविरुद्ध युद्ध लढायला गेलो होतो, पण त्याला संधी देण्यात आली नाही’.

शोएब अख्तर म्हणाला होता की, ‘माझ्या देशभक्तीवर कोणीही शंका घेऊ नये. फार कमी लोकांना माहीत आहे की, त्या दिवसांत माझा नॉटिंगहॅम काउंटी क्लबशी दोन दशलक्ष पौंडांचा एक करार झाला होता. पण जेव्हा कारगिल युद्ध सुरु झाले तेव्हा मी ते सर्व सोडून आलो होतो’.

तसेच, ‘लाहोरमध्ये येऊन उभा राहिलो होतो. हाजी जनरल माझ्याकडे आले आणि म्हणाले तू इथे काय करतो आहेस. मी म्हणालो लढाई सुरू होणार आहे, मरायचे असेल तर सोबतच मरु, बघून घेऊ सर्वांना". मी काउंटी सीझन सोडून परत आलो होतो आणि दोनदा लढायला गेलो होतो’, असेही शोएब अख्तर म्हणाला होता.

मी आलो आहे शस्त्रे तयार ठेवा-

भारताशी लढण्यासाठी शोएब अख्तरने काश्मीरमधील आपल्या मित्रांना फोन करुन शस्त्रे तयार ठेवण्यास सांगितले होते.

शोएब पुढे म्हणाला की, 'मी काश्मीरच्या मित्रांना फोन करुन सांगितले की, तुमच्याकडे जे काही (शस्त्रे) आहे ते तयार ठेवा... मी आता आलो आहे.

त्यानंतर माझी बायको हात मला जोडून म्हणाली, देवासाठी राहू द्या. भारताने जोरदार हल्ला केला होता. खूप नुकसान झाले होते. सकाळी उठल्यावर मला चक्कर यायला लागली होती. माझी बायको म्हणाली की टेन्शन घेऊ नकोस. तसेच, टेन्शनमध्ये मी लोकांशी भांडत देखील होतो". असे शोएब अख्तरने एका न्युज चॅनेलवर सांगितले आहे.

पुढील बातम्या