मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘.. ही काळ्या दगडावरील भगवी रेघ’, युवा सेनेचे बंडखोर आमदारांना खरमरीत पत्र

‘.. ही काळ्या दगडावरील भगवी रेघ’, युवा सेनेचे बंडखोर आमदारांना खरमरीत पत्र

Jun 23, 2022, 06:58 PM IST

    • औरंगादाबादचे आमदार संजय शिरसाट  यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले होते.  त्यांच्या  पत्राला युवा सेना पदाधिकाऱ्यांनी खरमरीत पत्र पाठवून उत्तर दिले आहे. 
युवा सेनेचेबंडखोर आमदारांना खरमरीत पत्र

औरंगादाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले होते. त्यांच्या पत्रालायुवा सेना पदाधिकाऱ्यांनीखरमरीत पत्र पाठवून उत्तर दिले आहे.

    • औरंगादाबादचे आमदार संजय शिरसाट  यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले होते.  त्यांच्या  पत्राला युवा सेना पदाधिकाऱ्यांनी खरमरीत पत्र पाठवून उत्तर दिले आहे. 

औरंगाबाद -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी बुधवारी वर्षा बंगला सोडण्यापूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता आणि पुढल्या काही तासात ते कुटुंबासह वर्षातून बाहेर पडले. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रभरात बंडखोर आमदारांवर राग व्यक्त केला जात आहे. दरम्यान औरंगादाबादचे आमदार संजय शिरसाटदेखील गुवाहाटीला शिंदे समर्थकांमध्ये आहेत. त्यांच्यापत्रालायुवा सेना पदाधिकाऱ्यांनीखरमरीत पत्र पाठवून उत्तर दिले आहे.शिवसेनेमुळेच तुम्ही तीन वेळेस आमदार झालात हे विसरू नका. तुमच्यावर काय अन्याय झाला तेच कळत नाही, असे या पत्रात म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यात म्हटले होते की, आमचा विठ्ठल चांगला आहे, मात्र बडव्यांमुळे त्यांची भेट होत नाही. आमच्यावर अन्याय होत आहे. आमची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे.

 

<p>युवा सेनेचे&nbsp;बंडखोर आमदारांना खरमरीत पत्र</p>

यावर संभाजीनगर युवा सेनेचे सरचिटणीस किरण लखनानी यांनी खरमरीत पत्र लिहून शिरसाट यांना जाब विचारला आहे. या पत्रात म्हटले आहे की, तुमच्यावर काय अन्याय झाला तेच कळत नाही. जेव्हा भाजपने तुम्हाला निवडणुकीत पराभूत करण्याचा पूर्ण प्लान बनवला होता, तेव्हा सामान्य शिवसैनिकांनी जीवाचे रान करून तुम्हाला निवडणून आणले. शिवसेनेमुळेच तुम्ही तीन वेळा आमदार झालात. आता तुमच्याशिवाय संभाजीनगर पश्चिममधून प्रचंड मताधिक्याने शिवसैनिक निवडून येणार, ही काळ्या दगडावरील भगवी रेघ.. या बंडाने शिवसेना खचून जाणार नाही तर बंडखोरांच्या छाताडावर पाय देऊन भगवा रोवला जाईल.