मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Murder Case : अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या; थरारक घटनेनं जळगाव हादरलं

Murder Case : अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या; थरारक घटनेनं जळगाव हादरलं

Dec 13, 2022, 09:05 AM IST

    • Murder Case In Jalgaon : भाडेकरुच्या पत्नीशी घरमालकाचे शारीरिक संबंध असल्याच्या कारणावरून एका तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.
Pune crime (HT_PRINT)

Murder Case In Jalgaon : भाडेकरुच्या पत्नीशी घरमालकाचे शारीरिक संबंध असल्याच्या कारणावरून एका तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

    • Murder Case In Jalgaon : भाडेकरुच्या पत्नीशी घरमालकाचे शारीरिक संबंध असल्याच्या कारणावरून एका तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

Jalgaon Crime News In Marathi : भाडेकरुच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून एका तरुणाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना समोर आली आहे. त्यामुळं जळगाव शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या तरुणाची गिरणा नदी परिसरात हत्या केली होती. त्यानंतर आता त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mahanand Dairy : महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! NDDB कडे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

SSC HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा उद्या निकाल?

Lok Sabha Election 2024 : महायुतीतील मतभेद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकला रवाना!

Mumbai Womens Abuses Police : मुंबईत तीन मद्यधुंद तरुणींची पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण, नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या प्रमोद शेट्टी नावाच्या तरुणाचं भाडेकरुच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्याची माहिती महिलेच्या पत्नीला समजली होती. त्यानंतर महिलेच्या पतीसह त्याच्या मित्रानं प्रमोदच्या हत्येचा कट आखला. प्रमोद घरी येत असताना दोन्ही आरोपींनी त्याला निमखेडी शिवारात अडवून त्याला मारहाण केली. याशिवाय त्याच्यावर दगडानं आणि धारदार शस्त्रानं वार केले. या मारहाणीत प्रमोद शेट्टीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही आरोपीं प्रमोदचा मृतदेह निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदीराजवळ फेकून पसार झाले. त्यानंतर तेथील स्थानिक लोकांना नदीकाढी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेतली.

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी मृत प्रमोदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी दोन्ही आरोपी जळगावातील उमाळा येथील जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापेमारी करत सत्यराज नितीन गायकवाड आणि सुनिल लियामत तडवी या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून हत्यारं जप्त केली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा