मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sushama Andhare: तुफानी भाषणानं शिवतीर्थावरचा दसरा मेळावा गाजवणाऱ्या सुषमा अंधारे आहेत कोण?

Sushama Andhare: तुफानी भाषणानं शिवतीर्थावरचा दसरा मेळावा गाजवणाऱ्या सुषमा अंधारे आहेत कोण?

Oct 06, 2022, 01:46 PM IST

    • Sushama Andhare: २०१९ च्या निवडणुकीत सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या. त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका तेव्हा केली होती.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे

Sushama Andhare: २०१९ च्या निवडणुकीत सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या. त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका तेव्हा केली होती.

    • Sushama Andhare: २०१९ च्या निवडणुकीत सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या. त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका तेव्हा केली होती.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचे तर बीकेसी मैदानातील शिंदे गटाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदेंचे भाषण झाले. मात्र या दोन्ही नेत्यांच्या आधीही काही नेत्यांनी भाषणे केली. त्यात शिवाजी पार्कवर शिवसेनेत नुकत्याच आलेल्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांच्या भाषणाची सध्या चर्चा आहे. तुफानी भाषणाने दसरा मेळावा गाजवणाऱ्या सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Metro : लोकसभा निवडणुकीत मतदान करा अन् मिळवा...; मुंबई मेट्रोची खास ऑफर!

Parbhani Murder: हॉटेलमध्ये नाश्ता देण्यावरून वाद, ग्राहक तरुणाची हत्या, तिघांविरोधात गुन्हा दाखल!

Akola Accident : अकोल्यात भीषण अपघात, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Pyarali Nayani : चित्रा वाघ अडचणीत येणार; अभिनेते प्याराली नयानी यांचा खटला दाखल करण्याचा इशारा

सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, हिंदुत्वावरून टीका करणाऱ्यांनी कोणत्या हिंदु धर्माच्या ग्रंथात दुसऱ्या धर्माचा द्वेष करावा असं सांगितलंय ते दाखवावं असं आव्हान शिंदे गटाला देते. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडसह मुस्लिम शिवसेनेच्या जवळ येत असल्यानंच अनेकांना त्रास होतोय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज शिवसेनेला काँग्रेससोबत गेल्यानं बोलत आहेत. पण तेच राणे दहा वर्षे सोनिया गांधींच्या पायावळ लोळण घेत होते, आमदार, खासदार, मंत्रिपदं मिळवली. आता त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करावी हे हास्यास्पद असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केली.

कोण आहेत सुषमा अंधारे?
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना वाढवण्यासाठी आपण लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. जुलै महिन्यात त्यांनी हाती शिवबंधन बांधलं. विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या. त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका तेव्हा केली होती.

वक्ता, लेखिका अन् सामाजिक कार्यकर्त्या
उस्मानाबादच्या कळबं तालुक्यात जन्मलेल्या सुषमा अंधारे या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी एमए, बीएड, पीएचडी, लॉ इत्यादी पदव्या मिळवल्या आहेत. वकील असलेल्या सुषमा अंधारे या राज्यशास्त्र अन् समाजशास्त्र विषयाच्या व्याख्याता आहेत. याशिवाय एक वक्ता आणि लेखिका अशीही त्यांची ओळख आहे. आपल्या खास आक्रमक शैलीतील भाषणासाठी त्या ओळखल्या जातात. अलिकडच्या काळात राजकीय मंचावरील भाषणांमुळे त्या सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील त्या सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. '

२०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीचा प्रचार करताना संभांमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवरही गंभीर टीका केली होती. आज त्याच सुषमा ठाकरे शिवसेनेच्या व्यासपीठावरून भाजपसह शिंदे गटावर बरसल्या. शिवसेनेत प्रवेशानंतर त्यांना प्रश्नही विचारला गेला होता की, आधी शिवसेनेसह उद्धव ठाकरेंवर टीका केली होती, आता शिवसेनेत प्रवेश करताय? यावर बोलताना अंधारे यांनी सांगितलं होतं की, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. मी टीका केली होती पण आज मनाने इकडे येतेय.