मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Unseasonal Rain : राज्यात पुढील पाच दिवस अवकाळीसह गारपिटीचा इशारा; १८ मार्चपर्यंत अलर्ट

Unseasonal Rain : राज्यात पुढील पाच दिवस अवकाळीसह गारपिटीचा इशारा; १८ मार्चपर्यंत अलर्ट

Mar 14, 2023, 06:49 PM IST

  • Unseasonal rain in Maharashtra : भारतीय हवामान विभागाकडून येत्या पाच दिवसात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातपावसाच्या सरी बरसणार आहेत.

Unseasonal Rain

Unseasonalrainin Maharashtra : भारतीय हवामान विभागाकडून येत्या पाच दिवसात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातपावसाच्या सरी बरसणार आहेत.

  • Unseasonal rain in Maharashtra : भारतीय हवामान विभागाकडून येत्या पाच दिवसात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातपावसाच्या सरी बरसणार आहेत.

Unseasonal rain in Maharashtra next five Days : महाराष्ट्रात १४ ते १८ मार्च म्हणजे पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून येत्या पाच दिवसात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातपावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

MHADA News : मुंबईतील ‘या’ उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

या महिन्यात आतापर्यंत दुसऱ्यांना शेतकऱ्यांना अवकाळीचा सामना करावा लागत आहे. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं तसेच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मंगळवारी नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे, की बुधवार १५ मार्च रोजी धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि जालन्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असून वादळी पाऊस होणार आहे.

गुरुवार १६ मार्च रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या दिवशी कोकणासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १७ मार्च रोजी जळगाव, अहमदनगर,पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

तर १८ मार्च रोजी अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

आज राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता -

मेघगर्जनेसह वादळ आणि येत्या तीन ते चार तासात जळगावसह खाणदेशात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा