मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Udayanraje Bhosale : 'शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना ह्यांना लाज कशी वाटत नाही?'

Udayanraje Bhosale : 'शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना ह्यांना लाज कशी वाटत नाही?'

Nov 24, 2022, 03:01 PM IST

  • Udayanraje Bhosale : खासदार उदयन राजे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या बेताल व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे. 

Udayanraje Bhosale

Udayanraje Bhosale : खासदार उदयन राजे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या बेताल व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे.

  • Udayanraje Bhosale : खासदार उदयन राजे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या बेताल व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे. 

पुणे : 'छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार केवळ मोठे पुतळे उभे करून चालणार नाही. तर त्यांच्या विचारांची दैनंदिन जीवनात अमलबजावणी झाली पाहिजे. देव कोणी पहिला नाही मात्र, शिवाजी महाराज हे देवासारखे होते. त्यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे लज्जास्पद आहे. शिवरायांनी त्यांच्या काळात जे योगदान दिले, त्यामुळे आज आपण लोकशाहीत मोकळा श्वास घेत आहोत. अन्यथा आपण गुलामगिरीत अजून अडकलो असतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन विचार आणि आदर्श कोण हे जनतेला स्पष्ट करून सांगावे. त्यांचा पंतप्रधान यांनी राजीनामा घ्यावा असे मत खासदार उदयनराजे यांनी गुरवारी पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केले. यापुढे अशाप्रकारे कोणी वक्तव्य केले तर त्यांना आम्ही नेस्तनाबूत करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

ट्रेंडिंग न्यूज

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणी अपमान करत असेल किंवा त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल तर त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार जुना झाला हे वाक्य राज्यपाल यांच्या तोंडून ऐकले हे ऐकून मी सुन्न झालो. त्यांच्या वाक्याला काय पुरावा आहे ? असा सवाल करत उडान राजे म्हणाले, त्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, नितीन गडकरी असताना त्यांनी शिवरायांच्या अवमनाबाबत त्यांच्या भाषणात भूमिका मांडणे गरजेचे होते. देशांत अनेक राजे मुघल साम्राज्य समोर शरण गेले. पण, छत्रपती शिवाजी महाराज हे कधी शरण गेले नाहीत. लोकांवर होणार अन्याय दूर करण्यासाठी आणि चांगले साम्राज्य देण्यासाठी त्यांनी आयुष्भर प्रयत्न केले. देशातील सर्वसामान्य लोकांना गुलामगिरी मधून मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रयत्न केले. आधुनिक भारत संकल्पना त्यांनी मांडली. अनेक जणांचे ते आदर्श स्फूर्तिस्थान ठरेल आहे.

तर देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही

पुढे बोलतांना उदयन राजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जुने झाले असतील तर देशाने आणि राज्याने कोणाला पाहून प्रगती केली? भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांनी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना लाज कशी वाटत नाही. सर्वधर्म समभाव, स्वराज्य संकल्पना, समानतेची वागणूक शिवाजी महाराज यांनी मांडली. अशाप्रकारे चुकीची विधाने कोणी करत असेल तर आमच्या सारख्या शिव भक्तांना चीड निर्माण होते. सर्वधर्म समभाव आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी यांचे विचार दिशादर्शक आहे. अन्यथा देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. सर्वसामान्य लोकांचा स्वराज्यात सहभाग असावा ही संकल्पना शिवाजी महाराज यांची होती. त्यांनी कधी स्वतःचे राज्य केले नाही तर रयतेचे राज्य संकल्पना राबवली. मात्र, आज समाजाचा विचार कमी झाला असून वयक्ती केंद्रित विचार झाले आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा