मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Marriage : जुळ्या मुलींशी लग्न करणं तरुणाला भोवणार; अकलूज पोलिसांत NCR दाखल

Viral Marriage : जुळ्या मुलींशी लग्न करणं तरुणाला भोवणार; अकलूज पोलिसांत NCR दाखल

Dec 04, 2022, 10:08 AM IST

  • Viral Marriage : तरुणानं एकाच मंडपात दोन तरुणींशी विवाह केल्याची घटना समोर आल्यानंतर आता त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एक नवरदेव, दोन वधू (हिंदुस्तान टाइम्स)

Viral Marriage : तरुणानं एकाच मंडपात दोन तरुणींशी विवाह केल्याची घटना समोर आल्यानंतर आता त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • Viral Marriage : तरुणानं एकाच मंडपात दोन तरुणींशी विवाह केल्याची घटना समोर आल्यानंतर आता त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Viral Marriage Video In Akluj Solapur : दोन दिवसांपूर्वी अकलुजमध्ये एक अनोखा विवाहसोहळा पार पडला होता. नवरदेवानं एकाच मंडपात दोन तरुणींशी लग्नगाठ बांधली होती. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं अनेक लोकांनी तरुणाचं कौतुक केलं होतं. परंतु आता माळेवाडीतील राहुल फुले यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली असून त्यानंतर आता पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केल्याची माहिती आहे. अतुल उत्तम अवताडे या तरुणानं दोन दिवसांपूर्वी रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या जुळ्या बहिणींशी एकाच मंडपात विवाह केला होता. त्यानंतर आता नवदाम्पत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur: ब्रेकअप झाल्यानं प्रियकर संतापला, प्रेयसी काम करत असलेले दुकानच पेटवून दिलं; नागपूर येथील घटना

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

नवरदेव अतुल हा माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील रहिवासी असून तो त्याचा मुंबईत ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. मुंबईत इंजिनियरींगचं शिक्षण घेऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या रिंकी आणि पिंकी या जुळ्या मुलींशी अतुलनं विवाह केला. पाडगावकर कुटुंबियांच्या सहमतीनंच हा विवाह झाला असून अकलुजच्या वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेलमध्ये हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं.

रिंकी आणि पिंकी या जुळ्या मुलींच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांची अतुलशी ओळख झाली होती. पाडगावकर कुटुंबातील या मुलींची आई आजारी पडल्यानंतर अतुलनं त्यांची फार काळजी घेतली होती. त्यामुळं दोन्ही मुलींची अतुलशी जवळीक वाढली होती. परंतु जुळ्या बहिणी असल्यानं कधीही वेगळं न व्हायचं ठरवलेल्या या मुलींनी एकाच मुलासोबत विवाह करायचं ठरवलं. त्यानंतर अतुलनं होकार दिल्यानंतर दोन्ही जुळ्या मुलींनी त्याच्यासोबत लग्नगाठ बांधली.

लग्नसोहळा पार पडल्यानंतर आता माळेवाडीतील राहुल फुले यानं अतुल आणि त्याच्या नव्या पत्नींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड संहितेच्या ४९४ कलमानुसार पोलिसांनी या प्रकरणात पीसीआर दाखल केला असून लवकरच प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा