मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  IAS Transfer : तुकाराम मुंढेंची २ महिन्यांत दुसऱ्यांदा बदली, राज्यातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transfer : तुकाराम मुंढेंची २ महिन्यांत दुसऱ्यांदा बदली, राज्यातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Nov 29, 2022, 08:32 PM IST

  • Tukaram Mundhe : दोन महिन्यात तुकाराम मुढेंची दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. तात्काळ कार्यमुक्त व्हा व पुढील आदेशाची वाट पाहा, असा आदेश शिंदे सरकारकडून काढण्यात आला आहे. 

तुकाराम मुंढेंची २ महिन्यांत दुसऱ्यांदा बदली

Tukaram Mundhe : दोन महिन्यात तुकाराम मुढेंची दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. तात्काळ कार्यमुक्त व्हा व पुढील आदेशाची वाट पाहा, असा आदेश शिंदे सरकारकडून काढण्यात आला आहे.

  • Tukaram Mundhe : दोन महिन्यात तुकाराम मुढेंची दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. तात्काळ कार्यमुक्त व्हा व पुढील आदेशाची वाट पाहा, असा आदेश शिंदे सरकारकडून काढण्यात आला आहे. 

राज्य सरकारने मंगळवारी सायंकाळ राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचा आदेश जारी केला. यामध्ये आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची दोन महिन्यांत दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात मुंढे यांची आरोग्य आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur: ब्रेकअप झाल्यानं प्रियकर संतापला, प्रेयसी काम करत असलेले दुकानच पेटवून दिलं; नागपूर येथील घटना

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

तुकाराम मुंढे यांची दोन महिन्यात दुसऱ्यांदा बदली करण्यात आली असली तरी त्यांच्याकडे कोणत्याही खात्याचा पदभार अद्याप देण्यात आलेला नाही. मात्र काही सुत्रांनुसार त्यांना शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आल्याची माहिती आहे. मुंढे याची १६ वर्षांच्या प्रशासकीय सेवेमध्ये तुकाराम मुंढे यांची २० पेक्षा अधिक वेळा बदली झाली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तुकाराम मुंढे यांच्याकडे डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून आरोग्य आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला होता. त्यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. काही दिवसांपूर्वीच आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना रात्री-बेरात्री भेटी देण्याचे आदेश काढले. रुग्णांना २४ तास वैद्यकीय सेवा मिळून त्यांची प्रकृती सुधारावी असा हेतू आदेशांमागे होता.

तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत एक परिपत्रक काढले होते. यामध्ये आरोग्य खात्यातील विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्याबाबत वेळोवळी सूचना देण्यात आल्या होत्या.

 

खालील अधिकाऱ्यांच्या बदल्या -

  • व्ही एन सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त एम एम आर डी ए यांची बदली आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पदावर.
  • भाग्यश्री बानाईत, मु.का.अ. शिर्डी संस्थान यांची बदली सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर या पदावर.
  • विनय सदाशिव मून, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी जि.प.
  • सौम्या शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी नांदेड यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर.
  • एस एम कुर्ती कोटी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर.
  • एस एस चव्हाण यांची नियुक्ती आयुक्त कृषी या पदावर.
  • तुकाराम मुंढे, आयुक्त कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची बदली - नियुक्ती प्रतीक्षाधीन