मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitin Gadkari : गडकरींना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन बेळगावमधून!, पोलीस तपासात उलगडा

Nitin Gadkari : गडकरींना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन बेळगावमधून!, पोलीस तपासात उलगडा

Jan 14, 2023, 06:33 PM IST

  • Nitin Gadkari Threat Call : नितीन गडकरी यांना धमकी देऊन त्यांच्याकडे १०० कोटींची खंडणी मागणारा फोन कर्नाटकातील बेळगावमधून आल्याचे तपासात उघड झाले आहे.

नितीन गडकरी

Nitin Gadkari Threat Call : नितीन गडकरी यांना धमकी देऊन त्यांच्याकडे १०० कोटींची खंडणी मागणारा फोन कर्नाटकातील बेळगावमधून आल्याचे तपासात उघड झाले आहे.

  • Nitin Gadkari Threat Call : नितीन गडकरी यांना धमकी देऊन त्यांच्याकडे १०० कोटींची खंडणी मागणारा फोन कर्नाटकातील बेळगावमधून आल्याचे तपासात उघड झाले आहे.

Nitin Gadkari Threat Call : भाजपाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे खळबळ माजली होती. अज्ञातांनी नितीन गडकरी यांच्या नागपुरमधील जनसंपर्क कार्यालयात तीन वेळा फोन करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता हा फोन कॉल बेळगावमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीला अटक करण्यासाठी नागपूर गुन्हे अन्वेषण पथक बेळगावकडे रवाना झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

नितीन गडकरी यांना १०० कोटींची खंडणी मागत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा फोन कर्नाटकातील बेळगावमधून आला होता. त्यामुळे या धमकीला वेगळे वळण मिळाले आहे.

नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी तीन वेळा फोन आले होते. गडकरी यांच्याकडे १०० कोटी खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर पोलिसी दलात खळबळ माजली होती. तपासाची चक्रे फिरल्यानंतर समजले की, हा फोन बेळगावमधून आला होता. नागपूर पोलीस कर्नाटक पोलिसांच्या मदतीने तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा