मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ठाण्यात १३ वर्षीय मुलाची मित्रांनी केली हत्या, २५ लाखांच्या खंडणीसाठी कृत्य

ठाण्यात १३ वर्षीय मुलाची मित्रांनी केली हत्या, २५ लाखांच्या खंडणीसाठी कृत्य

Aug 03, 2022, 08:28 AM IST

    • १३ वर्षीय मुलाची आई बारमध्ये काम करत असल्याने तिच्याकडे पैसे असतील असं समजून खंडणीसाठी मुलाचे अपहरण त्याच्याच मित्रांनी केले होते.
क्राइम न्यूज

१३ वर्षीय मुलाची आई बारमध्ये काम करत असल्याने तिच्याकडे पैसे असतील असं समजून खंडणीसाठी मुलाचे अपहरण त्याच्याच मित्रांनी केले होते.

    • १३ वर्षीय मुलाची आई बारमध्ये काम करत असल्याने तिच्याकडे पैसे असतील असं समजून खंडणीसाठी मुलाचे अपहरण त्याच्याच मित्रांनी केले होते.

ठाण्यात मिरारोड इथं एका १३ वर्षीय मुलाची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ लाखांच्या खंडणीसाठी हे कृत्य करण्यात आल्याचं समोर आलं आहे. १३ वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याची चाकूने भोसकून हत्या केली गेली. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मिरा रोड येथील शांतीपार्क परिसरात हिना नहार सिंग या राहतात. त्यांना अजय (१५) आणि मयांक सिंग (१३) अशी दोन मुलेही आहेत. बोरिवलीत एका बार मध्ये गायिका म्हणून त्या काम करतात. रविवारी रात्री नेहमप्रमाणे त्या कामावर गेल्या होती. तेव्हा रात्री १२ च्या सुमारास मुलगा मयांक हा घरातून बेपत्ता झाला होता.

मयांक बेपत्ता झाल्यानंतर याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी दुपारी मयंकचा मृतदेह वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला होता. त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. काशिमिरा पोलिसांनी याप्रकरणी अफझल अन्सारी (२२) आणि इम्रान शेख (२४) अशा दोन आरोपींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी हे मयत मुलाचे मित्र होते. मयांकची आई बारबाला असल्याने तिच्याकडे भरपूर पैसे असतील असं त्यांना वाटत होतं. पैशांच्या आमिषाने त्यांनी मयांकचे अपहरण केलं. त्यानंतर खंडणीचा बनाव रचला होता. दरम्यान, मयांकला संशय आल्याने आरोपींनी त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याच्याच फोनवरून खंडणी मागण्यात आली होती, असेही पोलिसांनी सांगितले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा