मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Toy Train: बच्चे कंपनीची आवडती ‘वनराणी’ ट्रेन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा धावणार

Toy Train: बच्चे कंपनीची आवडती ‘वनराणी’ ट्रेन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा धावणार

HT Marathi Desk HT Marathi

Sep 22, 2022, 02:06 PM IST

  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील सर्वोत्तम ट्रेन या उद्यानात आणली जाईल असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. (Van Rani toy train in Sanjay Gandhi National Park)

Government will restart Toy train in Sanjay Gandhi National Park in Mumbai

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील सर्वोत्तम ट्रेन या उद्यानात आणली जाईल असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. (Van Rani toy train in Sanjay Gandhi National Park)

  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील सर्वोत्तम ट्रेन या उद्यानात आणली जाईल असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. (Van Rani toy train in Sanjay Gandhi National Park)

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहानमोठ्या सर्वांना सर्वांना मोहित करणारी ‘वनराणी‘ ही टॉय ट्रेन काही वर्षांपूर्वी कार्यान्वित होती. कालांतराने ही ट्रेन बंद पडली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील सर्वोत्तम ट्रेन या उद्यानात आणली जाईल असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. उद्यानात येणाऱ्या लहान मुलांसह प्रत्येकाला अशा ट्रेनचे आकर्षण असते. ही ट्रेन सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करत असल्याने या उद्यानात ट्रेन आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुणगंटीवार म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

Lok sabha Election : नाराज नसीम खान यांचा यू-टर्न; काँग्रेस उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॅक्सीडर्मी सेंटर (मृगया चिन्ह केंद्र), वन्यजीव रुग्णालय आणि कॅट ओरिएंटेशन सेंटर (मार्जार वंशाची सर्व माहिती देणारे केंद्र) आदी बांधकामांचा लोकार्पण सोहळा नुकताच वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे माजी कार्यकारी संचालक इ्ररिक सोलेम, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रविण दरेकर, अभिनेत्री रवीना टंडन उपस्थित होते.

रविना टंडन राज्य शासनाच्या वन्यजीव सदिच्छादूत

अभिनेत्री रविना टंडन या राज्य शासनाच्या वन्यजीव सदिच्छादूत म्हणून काम करणार असून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांची मदत होणार आहे.

ज्याप्रमाणे शहरांच्या विकासासाठी विकास आराखडा असतो त्याच प्रमाणे वन विभागामार्फत वन संरक्षण व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. आमदार दरेकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन ग्रंथालय सुरू करण्याची मागणी केली. हे वन ग्रंथालय वन्यजीवांविषयक माहिती देण्यासाठी तसेच येथे येणाऱ्या अभ्यासकांना माहिती घेण्यासाठी उपयोगी पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आठ वन्यजीव रुग्णवाहिका कार्यान्वित

राज्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डहाणू, ठाणे, अलिबाग, रोहा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आजपासून आठ वन्यजीव रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा