मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shil Daighar : वाहनाला साईट न दिल्याने एसटी ड्रायव्हरला बेदम मारहाण; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Shil Daighar : वाहनाला साईट न दिल्याने एसटी ड्रायव्हरला बेदम मारहाण; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Jan 23, 2023, 05:15 PM IST

    • Shil Daighar Crime News : महामार्गावर वाहनाला साईट न दिल्यामुळं आरोपींनी एसटी ड्रायव्हरला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
Shil Daighar Thane Crime News (HT)

Shil Daighar Crime News : महामार्गावर वाहनाला साईट न दिल्यामुळं आरोपींनी एसटी ड्रायव्हरला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

    • Shil Daighar Crime News : महामार्गावर वाहनाला साईट न दिल्यामुळं आरोपींनी एसटी ड्रायव्हरला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Shil Daighar Thane Crime News : महामार्गावरून प्रवास करत असताना एसटी ड्रायव्हरनं कारला साईट न दिल्यामुळं आरोपींनी बसचालकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यातील शिळ-डायघरमध्ये ही घटना घडली असून त्यानंतर आता सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मारहाणीत जखमी झालेल्या बसचालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोरख कसबे असं मारहाणीत जखमी झालेल्या एसटी ड्रायव्हरचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur: ब्रेकअप झाल्यानं प्रियकर संतापला, प्रेयसी काम करत असलेले दुकानच पेटवून दिलं; नागपूर येथील घटना

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी चालक गोरख कसबे हे शिळ-डायघरमधून पडले गावाच्या मार्गानं एसटी घेऊन निघाले होते. त्यावेळी महामार्गावर शेजारून जाणाऱ्या कारला साईट न दिल्यामुळं कारचालकानं बसच्या समोर वाहन थांबवून बसचालकाला अश्लिल भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. वाहकानं भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीनं त्यांनाही धक्काबुक्की केली. वाद वाढल्यानंतर आरोपीनं त्याच्या मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतलं. त्यानंतर सर्व आरोपींनी चालकासह वाहकाला बेदम मारहाण केली. बसमधील प्रवाशांनी चालक आणि वाहकाला सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी प्रवाशांनाही धमकी दिली. त्यानंतर चालकानं घडलेल्या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

पोलीस येत असल्याचं समजताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींनी केलेल्या मारहाणीत बसचालक गोरख कसबे यांना गंभीर मार लागलेला आहे. घटनास्थळी शिळ-डायघर पोलीस आल्यानंतर त्यांनी कसबे यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं असून तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. आरोपी अद्यापही फरार असल्यानं त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.