मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik firing : नाशिकमध्ये शिंदे-ठाकरे गटात राडा, शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा हवेत गोळीबार

Nashik firing : नाशिकमध्ये शिंदे-ठाकरे गटात राडा, शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा हवेत गोळीबार

Jan 20, 2023, 07:15 AM IST

    • Nashik News : नाशिक येथे शिदे-ठाकरे गटात गुरुवारी मोठा राडा झाला. दोन्ही गट आमने-सामने आल्यावर झालेल्या वादातून शिंदे गटाच्या पदाधीकाऱ्याच्या मुलाने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार केला.
Nashik firing :

Nashik News : नाशिक येथे शिदे-ठाकरे गटात गुरुवारी मोठा राडा झाला. दोन्ही गट आमने-सामने आल्यावर झालेल्या वादातून शिंदे गटाच्या पदाधीकाऱ्याच्या मुलाने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार केला.

    • Nashik News : नाशिक येथे शिदे-ठाकरे गटात गुरुवारी मोठा राडा झाला. दोन्ही गट आमने-सामने आल्यावर झालेल्या वादातून शिंदे गटाच्या पदाधीकाऱ्याच्या मुलाने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार केला.

Nashik News : नाशिक शहरातील देवळाली परिसर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वादाने गुरुवारी हादरले. गुरुवारी सायंकाळी झालेय दोन्ही गटातील वाद टोकाला गेला. यातून शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटे यांच्या मुलाने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार केल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित सर्व पक्षीय बैठकीत ही घटना घडली.

ट्रेंडिंग न्यूज

मेट्रिमोनियल साईटवरून तब्बल २२ मुलींची फसवणूक तर ७ तरुणींना लग्न करून गंडवले, आरोपीला अटक

somaiya school: पॅलेस्टाईन-इस्त्रायल संघर्षासंदर्भात पोस्टला Like करणे भोवले; मुख्याध्यापिकेला नोकरीवरून काढले

Pune warje firing : बारामतीमध्ये मतदान संपताच पुण्यातील वारजे माळवाडीत गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या तिघांनी केले फायरिंग

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवड्याला अवकाळी पाऊस झोडपणार! हवामान विभागाचा यलो अलर्ट, गारपीटीचीही शक्यता

नाशिकच्या देवळाली येथे गुरुवारी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाच्या अध्यक्षपदावरुन चर्चा सुरु होती. यावेळी अचानक शिंदे गट आणि ठाकरे गटात वादावादी सुरू झाली. यावरून शिंदे गटाचे सूर्यकांत लवटे यांचा मुलगा स्वप्निल सूर्यकांत लवटे याने हवेत गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे बैठकीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नगरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. भीतीपोटी नागरिकांनी आपले दुकाने बंद केली.

दरम्यान सभेत गोंधळ आणि गोलिबाळ झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी धरपकड सुरू केली असून पोलिसांनी स्वप्निल लवटेला अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे हे गेल्या महिन्यात काही कार्यकर्ते यांच्या सोबत शिंदे गटात समाविष्ट झाले होते. दरम्यान, ठाकरे गटातील गळती रोखण्यासाठी खासदार संजय राऊत प्रयत्नशील होते. त्यांनी दोन वेळा दौरा करूनही ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि नगर सेवकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. दरम्यान, कालच्या घटनेवरून नाशिकच्या देवळाली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा