मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune warje firing : बारामतीमध्ये मतदान संपताच पुण्यातील वारजे माळवाडीत गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या तिघांनी केले फायरिंग

Pune warje firing : बारामतीमध्ये मतदान संपताच पुण्यातील वारजे माळवाडीत गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या तिघांनी केले फायरिंग

May 08, 2024, 11:34 AM IST

  • Pune warje firing : पुण्यात काल रात्री बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान संपताच वारजे माळवाडीत गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यातील वारजे माळवाडीत बारामतीतील मतदान संपताच गोळीबार; दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी केले फायरिंग

Pune warje firing : पुण्यात काल रात्री बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान संपताच वारजे माळवाडीत गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

  • Pune warje firing : पुण्यात काल रात्री बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान संपताच वारजे माळवाडीत गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Pune warje firing : पुण्यात खून, दरोडे, चोऱ्या, गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. दोन खून होण्याची घटना ताजी असतांना मंगळवारी बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान संपल्यावर वारजे माळवाडी येथील रामनगर भागात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे या परसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Loksabha Poll : मतदानाची टक्केवारी घसरली! तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के नागरिकांनी बजावला हक्क; राज्यात इतके टक्के मतदान

पुण्यात काल बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाले. या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. वारजे माळवाडी हा भाग बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला मतदार संघात येतो. या ठिकाणी मतदान झाल्यावर रात्री ११ च्या सुमारास येथील रामनगर परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी हवेत तीन राऊंड फायर केले. या मुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवड्याला अवकाळी पाऊस झोडपणार! हवामान विभागाचा यलो अलर्ट, गारपीटीचीही शक्यता

गोळीबाराचे कारण अस्पष्ट

वारजे येथे मतदान शांततेत पार पडल्यानंतर रामनगर परिसरात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास मिळाली. या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस आणि गुन्हे शाखेतील पथकांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रामनगर भागातील शक्ती चौकात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याचे तपासात पुढे आले. मात्र, हा गोळीबार का करण्यात आला याची माहिती अद्याप पुढे आली नाही. पोलिस याचा तपास करत आहेत.

आरोपी फरार

आरोपी हे एका दुचाकीवरून आले होते. हवेत पिस्तुलातून गोळीबार केल्यावर आरोपी हे फरार झाले. गोळीबार करणारे आरोपी हे मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गाने दुचाकीवरुन कात्रजकडे फरार झाले. या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गोळीबार झालेल्या चौकातील सिसिटीव्ही तपासण्यात येत असून आरोपींना लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांनी दिली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या