Maharashtra Weather Update : राज्यात बहुतांश जिल्ह्यातील तापमान मंगळवारी कमी होते. पुढील काही दिवस राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र व विदर्भात पुढील तीन दिवस म्हणजेच ७, ८, ९ मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोडी, गोंदिया, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना वीजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील खालच्या स्थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा पूर्व विदर्भ ते उत्तर तामिळनाडू पर्यंत जात आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुढील तीन दिवस म्हणजेच ७, ८, ९ मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात ९ व ११ मे रोजी विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच ११ मे पर्यंत मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ७ मे रोजी नांदेड व लातूर जिल्ह्यात तर ८ मे रोजी हिंगोली, नांदेड व लातूरला तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कटकडात, मेघ गर्जना व वादळी वारासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
विदर्भात बहुतांश जिल्ह्यात आज पासून ११ मे पर्यंत मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोडी, गोंदिया, अमरावती नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये आज व ८ मे रोजी गारांसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात सुद्धा यलो यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे व परिसरात आज आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून ११ मे पर्यंत आकाश मुख्यता निरभ्र राहून दुपार किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शकहीत आहे. पुण्यात मंगळवारी ३९ डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
मराठवड्यात आणि विदर्भात मंगळवारी तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे होते. अकोला ४३.७, अमरावती, ४२.८, बुलढाणा ४०.२, ब्रम्हपुरी ३८.९, चंद्रपुर ४२.४, गोंदिया ३७.०, नागपुर ३८.१, वाशिम ४३.४, वर्धा ४३, यवतमाळमध्ये ४२.५ डिग्री सेल्सिअस तापमान होते.