Uddhav Thackeray : मोदींच्या ‘एक्सपायरी डेट’वर उद्धव ठाकरेंचा पलटवार, म्हणाले ‘तुमचा बुरशी आलेला माल…’
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Uddhav Thackeray : मोदींच्या ‘एक्सपायरी डेट’वर उद्धव ठाकरेंचा पलटवार, म्हणाले ‘तुमचा बुरशी आलेला माल…’

Uddhav Thackeray : मोदींच्या ‘एक्सपायरी डेट’वर उद्धव ठाकरेंचा पलटवार, म्हणाले ‘तुमचा बुरशी आलेला माल…’

May 07, 2024 10:08 PM IST

Uddhav Thackeray on modi :मोदीच्या एक्सपायरी डेट टीकेवर उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, तुमचा बुरशी आलेला माल लोकांनी पाहिला आहे. तो ४ जूनला आम्ही केराच्या टोपलीत फेकून देणार आहोत.

मोदींच्या ‘एक्सपायरी डेट’वर उद्धव ठाकरेंचा पलटवार
मोदींच्या ‘एक्सपायरी डेट’वर उद्धव ठाकरेंचा पलटवार

उद्धव ठाकरेंची आजधुळ्यात प्रचार सभा पार पडली. आपल्या भषणात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली.भाजपाने धुळेकरांचे कोणते प्रश्न सोडवले? कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. केंद्र सरकार गुजरातच्या शेतकऱ्यांची कांद्याची निर्यातबंदी उठवतात. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कांद्यावरील निर्यातबंदी उठवत नाहीत,महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भेदभाव करत आहेत. मागल्या वेळी याच महाराष्ट्राने ४० पेक्षा जास्त खासदार निवडून दिले होते. त्यामुळेच तुम्ही दिल्ली पाहिली. मात्र, यावेळी महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही

मोदी म्हणतात ४ जूनला आमची (इंडिया आघाडी) एक्सपायरी डेट आहे. अहो तुमचा बुरशी आलेला माल लोकांनी पाहिला आहे. तो ४ जूनला आम्ही केराच्या टोपलीत फेकून देणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना आता गोमूत्रधाऱ्यांना ओझं व्हायला लागली आहे. त्यामुळे त्यांना ४०० पार खासदार करून संविधान बदलायचं आहे. मात्र,त्या संविधानाचे रक्षण आपल्याला करायचे आहे. या लोकांनी शेतकऱ्यांशी गद्दारी केली आहे.

आता ४ जून पर्यंत थांबा,५ जूननंतर तुम्ही सुरतच्या बिळात जरी लपलात तरी ते बीळ खोदून तुमच्या शेपट्या धरून तुम्हाला आम्ही उलटं लटकवल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीएकासाध्या,दलित कुटुंबात जन्मात आलेला मुलगा इतका बुद्धिमान कसा असू शकतो,त्याने लिहिलेली घटना ही या बुरसटलेल्या गोमुत्रधाऱ्यांना आता ओझं व्हायला लागली आहे. त्या दलित माणसाने लिहिलेली घटना आम्ही काय म्हणून पाळायची?म्हणून यांना४००पार खासदार निवडून आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलायची आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

भाजपाचे नेते मुनगंटीवार बहिण भावाच्या नात्यावर काय बोलले ते सर्वांनी पाहिले. हीच का भाजपाची संस्कृती. ज्यांना बहिण भावाचं नातीची पवित्रता माह्ती नाही ते भाजपवाले आम्हाला काय हिंदुत्व शिकवणार?तुमच्याकडून आम्ही हे हिंदुत्व शिकायचं का?म्हणेनरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे. या देशात महिला सुरक्षित नाहीत. दिल्लीत आंदोलनास बसलेल्या महिला खेळाडूंकडे बघायला तुम्हाला वेळ नाही. मणिपूरात महिलांची नग्न धिंड काढली तरी पंतप्रधान तिकडे फिरकले नाहीत. कर्नाटकातील मास रेपिस्ट प्रज्वल रेवन्ना फरार झाला.

नगरमधील महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. ते म्हणाले,  ४ जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असून त्यानंतर या आघाडीचे झेंडे उचलायलाही कोणी मिळणार नाही ,अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

Whats_app_banner