मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवड्याला अवकाळी पाऊस झोडपणार! हवामान विभागाचा यलो अलर्ट, गारपीटीचीही शक्यता

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवड्याला अवकाळी पाऊस झोडपणार! हवामान विभागाचा यलो अलर्ट, गारपीटीचीही शक्यता

May 08, 2024, 06:44 AM IST

    • Maharashtra Weather Update : राज्यात बहुतांश जिल्ह्यातील तापमान मंगळवारी कमी होते. पुढील काही दिवस राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवड्याला अवकाळी पाऊस झोडपणार! हवामान विभागाचा यलो अलर्ट, गारपीटीचीही शक्यता

Maharashtra Weather Update : राज्यात बहुतांश जिल्ह्यातील तापमान मंगळवारी कमी होते. पुढील काही दिवस राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    • Maharashtra Weather Update : राज्यात बहुतांश जिल्ह्यातील तापमान मंगळवारी कमी होते. पुढील काही दिवस राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात बहुतांश जिल्ह्यातील तापमान मंगळवारी कमी होते. पुढील काही दिवस राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र व विदर्भात पुढील तीन दिवस म्हणजेच ७, ८, ९ मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोडी, गोंदिया, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना वीजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

PDCC Bank : बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील खालच्या स्थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा पूर्व विदर्भ ते उत्तर तामिळनाडू पर्यंत जात आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुढील तीन दिवस म्हणजेच ७, ८, ९ मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात ९ व ११ मे रोजी विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray : मोदींच्या ‘एक्सपायरी डेट’वर उद्धव ठाकरेंचा पलटवार, म्हणाले ‘तुमचा बुरशी आलेला माल…’

मराठवाड्यात पुढील पाच दिवस पावसाचे

मराठवाड्यात आजपासून पुढील पाच दिवस म्हणजेच ११ मे पर्यंत मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ७ मे रोजी नांदेड व लातूर जिल्ह्यात तर ८ मे रोजी हिंगोली, नांदेड व लातूरला तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कटकडात, मेघ गर्जना व वादळी वारासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

विदर्भात गारपीट होण्याची शक्यता

विदर्भात बहुतांश जिल्ह्यात आज पासून ११ मे पर्यंत मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोडी, गोंदिया, अमरावती नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये आज व ८ मे रोजी गारांसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात सुद्धा यलो यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

Haryana News : हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात! ३ अपक्ष आमदार काँग्रेसच्या गोटात, सरकारला धोका किती?

पुण्यात अंशत: वातावरण राहणार ढगाळ

पुणे व परिसरात आज आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून ११ मे पर्यंत आकाश मुख्यता निरभ्र राहून दुपार किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शकहीत आहे. पुण्यात मंगळवारी ३९ डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

मराठवाडा, विदर्भात तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे

मराठवड्यात आणि विदर्भात मंगळवारी तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे होते. अकोला ४३.७, अमरावती, ४२.८, बुलढाणा ४०.२, ब्रम्हपुरी ३८.९, चंद्रपुर ४२.४, गोंदिया ३७.०, नागपुर ३८.१, वाशिम ४३.४, वर्धा ४३, यवतमाळमध्ये ४२.५ डिग्री सेल्सिअस तापमान होते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या